Home /News /sport /

Tokyo Olympics: पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये तलवार गाजवणारी भवानी देवी कोण आहे?

Tokyo Olympics: पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये तलवार गाजवणारी भवानी देवी कोण आहे?

भारताची तलवारबाज भवानी देवीनं (Bhavani Devi) सोमवारी नव्या इतिहासाची नोंद केली. ती ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय बनली आहे.

    टोकयो, 26 जुलै: भारताची तलवारबाज भवानी देवीनं (Bhavani Devi) सोमवारी नव्या इतिहासाची नोंद केली. ती ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय बनली आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाला जमली नाही, अशी कामगिरी भवानीनं केली. राष्ट्रीय चॅम्पियन भवानीला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यात अपयश आले, मात्र तिने अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे. ऐतिहासिक कामगिरी भवानीनं सकाळी मैदानात उतरताच इतिहास रचला होता. मात्र ती इतक्यावरच थांबली नाही. तिनं पहिल्या मॅचमध्ये ट्यूनेशियाच्या नादिया बेनचा 15-3 असा पराभव केला. या सामन्यात भवानीनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला आणि आघाडी घेतली. भवानीची दुसऱ्या फेरीतील लढत फ्रान्सची वर्ल्ड नंबर तीन तलवारबाज मॅनन ब्रुनेटबरोबर होती. ब्रुनेटनं रिओ ऑलिम्पिकमध्ये सेमी फायनलपर्यंत धडक मारली होती. अनुभवी ब्रुनेटचं मॅचमधील पारडं जड होतं. तिने सुरुवात देखील चांगली करत 11-2 अशी आघाडी घेतली. त्यानंतर भवानीनं शर्थीचे प्रयत्न करत पॉईंट्स कमावले. शेवटच्या टप्प्यात रंगलेल्या या सामन्यात ब्रुनेटनं 15-7 असा विजय मिळवला. पर्याय नव्हता म्हणून निवडला खेळ तामिळनाडूच्या भवानी देवीचा तलवारबाजीमध्ये प्रवेश नाईलाजानं झाला. तिच्या शाळेत सहा खेळ होते. तिला यापैकी एका खेळाची निवड करायची होती. भवानीनं निवड करण्यापूर्वी अन्य खेळातील जागा पूर्ण झाल्या. त्यामुळे तिनं तलवारबाजीचा खेळ निवडला. खेळ नाईलाजानं निवडला असला तरी थोड्याच वेळात भवानीला तलवारबाजीची गोडी लागली.  त्यामुळे केरळमधील राष्ट्रीय अकादमीमध्ये तिची निवड झाली. भवानीनं 2009 मधील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिले मेडल पटकावले. त्या स्पर्धेत ती तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर 2014 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकण्याचा विक्रम भवानीनं केला. 'खेळासाठी खोटं बोलले' तलवारबाजी खेळण्यासाठी मी खोटं देखील बोलले असल्याची कबुली भवानीनं यापूर्वी दिली आहे. 'मला वडिलांचे वार्षिक उत्पन्न विचारण्यात आले होते, कारण तलवारबाजी हा खेळ खूप महाग आहे. त्यावेळी मी खोटं बोलले आणि वडिलांचे उत्पन्न जास्त सांगितले. सुरुवातीच्या काळात आम्ही बांबूच्या काठीनं सराव करत असू आणि तलवारीचा वापर हा फक्त स्पर्धेत केला. तलवार खूप महाग असल्यानं ती तुटली तर तिचा खर्च आम्हाला परवडणारा नव्हता. तसंच ती भारतामध्ये सहज मिळत नव्हती, ' असं भवानीनं सांगितलं. VIDEO: रणवीर सिंहनं घेतली माहीची गळाभेट, मैदानात दिसलं दोघांचं special bonding भारतीयांना प्रेरणा सायना नेहवालनं 2012 मधील लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. ते भारताचे बॅडमिंटनमधील पहिले ऑलिम्पिक मेडल होते. सायनापासून प्रेरणा घेत पीव्ही सिंधूनं 2016 मधील रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकले . त्याचबरोबर तिनं वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले. भवानीनं देवीनंही ऑलिम्पिकमध्ये तलवार गाजवत अनेक भारतीयांना हा खेळ खेळण्याची प्रेरणा दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhavani devi, Olympics 2021, Sports

    पुढील बातम्या