Home /News /sport /

VIDEO: रणवीर सिंहनं घेतली माहीची गळाभेट, मैदानात दिसलं दोघांचं special bonding

VIDEO: रणवीर सिंहनं घेतली माहीची गळाभेट, मैदानात दिसलं दोघांचं special bonding

बॉलिवूड स्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो. सध्या तो टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) बरोबर असलेल्या बॉन्डिंगमुळे चर्चेत आहे.

  मुंबई, 26 जुलै: बॉलिवूड स्टार रणवीर सिंह (Ranveer Singh) वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असतो. सध्या तो टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) बरोबर असलेल्या बॉन्डिंगमुळे चर्चेत आहे. रणवीर आणि धोनी  हे दोघं नुकतेच मुंबईतील एका स्टेडियमममध्ये फुटबॉल खेळताना दिसले. त्यावेळी दोघांनी एकमेकांसोबत भरपूर धमाल केली. फुटबॉल गाऊंडवरील या दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाला आहे. यामध्ये हे दोघं एकमेकांशी बोलताना तसंच जवळच्या मित्रांप्रमाणे गळाभेट घेताना दिसत आहेत. रणवीर आणि धोनी हे दोघंही ऑल स्टार फुटबॉल क्लबचे सदस्य आहेत. देशात फुटबॉलला चालना देण्याचं काम हा क्लब करतो. त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांना मदतनिधी देण्यासाठी फुटबॉल मॅचचं आयोजनही या क्लबकडून केलं जातं. या क्लबनं आयोजित केलेल्या फुटबॉल मॅचमध्ये अनेक क्रिकेटपटू तसंच बॉलिवूड स्टार सहभागी होत असतात. रणीवर आणि धोनीनं रविवारी एकत्र फुटबॉलचा सराव केला. यामध्ये ते दोघंही टीममधील अन्य सदस्यांप्रमाणे नियॉन ग्रीन जर्सीमध्ये होते. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये टीममधील अन्य खेळाडू देखील मैदानात उपस्थित होते.
  Tokyo Olympics : टेबल टेनिसमध्ये पदकाची आशा कायम, दिग्गज खेळाडूचा विजय महेंद्रसिंह धोनी आणि रणवीर सिंहसह सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान पतौडी देखील मैदानात उपस्थित होता. इब्राहिम ऑरेंज जर्सीमध्ये होता. त्याने सुरुवातीला स्ट्रेचिंग केले. तसंच तो खेळाची तयारी करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: MS Dhoni, Ranveer sigh, Video viral

  पुढील बातम्या