मुंबई, 3 जून: टोक्यो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympic 2021) प्रतीक्षेत असलेल्या बॅडमिंटन फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे. ब्राझीलमध्ये 2020 साली झालेल्या ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक (Gold Medal) विजेती बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीननं (Carolina Marin) दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. जगातील सर्वोत्तम बॅडमिंटनपटूंमध्ये स्पेनच्या (Spain) कॅरोलिना मरीनचा समावेश आहे. मरीननं ऑलिम्पिक सुवर्णपदकासह वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या दुखापतीमुळे आपण आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकत नसल्याचं तिनं मंगळवारी जाहीर केलं. सिंधूनं जिंकलं मन कॅरोलिना मरीननं माघार घेतल्यानं तिची बॅडमिंटन कोर्टावरील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारताच्या पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) हिला धक्का बसला आहे. तिनं मरिनसाठी एक खास व्हिडीओ संदेश पाठवला असून त्यामध्ये ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना केली आहे. " तुझ्या दुखापतीबद्दल ऐकून वाईट वाटलं. तू लवकरच बरी होऊन बॅडमिंटन कोर्टामध्ये परतशील. मला मागील ऑलिम्पिक आठवते, त्यावेळी आपण फायनल खेळलो होतो. मला तुझी कमतरता जाणवेल." असा मेसेज सिंधूनं तिच्या मैत्रिणीला पाठवला आहे.
A beautiful gesture from PV Sindhu. 💞
— The Olympic Games (@Olympics) June 2, 2021
After Spain's Olympic badminton champion @CarolinaMarin was forced to withdraw from #Tokyo2020 with injury, Indian friend and rival @pvsindhu1 has sent a moving message of support. #StrongerTogether I @bwfmedia I @COE_es
सिंधूचा मार्ग सोपा कॅरोलिना मरीननं माघार घेतल्यानं सिंधूची सुवर्णपदक जिंकण्याची आशा वाढली आहे. गेल्या अनेक स्पर्धांमध्ये सिंधूला फक्त मरीनचा अडथळा पार करण्यात अपयश आले आहे. सिंधू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकाची दावेदार असलेली भारताची एकमेव महिला बॅडमिंटनपटू आहे. दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालला (Saina Nehwal) या स्पर्धेसाठी पात्र होण्यास अपयश आले आहे. टोक्यो ऑलिम्पिक क्वालिफायिंगचा कालावधी 15 जूनला संपत आहे, तसंच आता क्वालिफायिंग सामने खेळवण्यासाठी वेळही नाही, त्यामुळे आता रॅकिंगमध्ये बदल होणार नाही, असं महासंघाने स्पष्ट केलं. कोरोना संकटामुळे तीन स्पर्धा रद्द करण्यात आल्या, त्यानंतर क्वालिफिकेशनचा कालावधी दोन महिने म्हणजेच 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला होता. धोनी किंवा विराट नाही तर ‘या’ खेळाडूसारखी बॅटींग करण्याची आहे सुनील गावसकरांची इच्छा त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे इंडिया ओपन, मलेशिया ओपन आणि सिंगापूर ओपन या स्पर्धांचं आयोजन होऊ शकलं नाही. त्यामुळे सायनाचं ऑलिम्पिक खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे.