मुंबई, 3 मे: भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांची क्रिकेट विश्वातील महान बॅट्समन अशी ओळख आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार पेक्षा जास्त रन करणारे ते पहिले बॅट्समन आहेत. त्यांचे खेळण्याचे तंत्र हे अतिशय भक्कम होते. आजही टेस्ट क्रिकेट खेळणारे खेळाडू त्या तंत्राची कॉपी करण्याचा प्रयत्न करत असतात.
टेस्ट क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड करणाऱ्या गावसकांराना टी 20 क्रिकेट देखील तितकेच आवडते. एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये गावसकरांनी त्याचं कारण सांगितलं आहे. 'माझ्या सोबत क्रिकेट खेळलेल्या अनेकांना टी20 प्रकार आवडत नाही. हे मला माहिती आहे. पण मला तो आवडतो. हा प्रकार आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे हा फक्त 3 तासांचा खेळ आहे. तीन तासांमध्ये तुम्हाला निकाल कळतो. हा खेळ करताना अनेक कृती घडत असतात.
एखादा बॅट्समन रिव्हर्स स्वीप (reverse sweep) मारतो त्यावेळी मी अनेकदा खुर्चीवरुन उठून उभा राहतो.या प्रकारच्या शॉट्सवर सिक्स मारण्यासाठी प्रचंड कौशल्याची गरज आहे,'' असे त्यांनी सांगितले.
'या' बॅट्समनसारखी खेळण्याची इच्छा
गावसकर यांनी यावेळी आधुनिक क्रिकेटमधील एका बॅट्समनचा विशेष उल्लेख केला. या बॅट्समनसारखी बॅटींग करण्याची आपल्याला आवडले असते, असे त्यांनी सांगितले. तो खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) किंवा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) नाही. तर क्रिकेट विश्वात मिस्टर 360 म्हणून प्रसिद्ध असलेला एबी डीव्हिलियर्स (AB de Villiers) आहे.
25 वर्षानंतर लॉर्ड्सवर इतिहास घडला, या क्रिकेटपटूने केली गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी
" मला डीव्हिलियर्ससारखी बॅटींग करायला आवडेल. तो 360 अंशामध्ये खेळतो, हे सर्वांना माहिती आहे. तो सर्व पद्धतीचे शॉट्स मारतो. तो बॅटींगला अगदी सोपं करतो. तो अगदी लांबपर्यंत फटका मारु शकतो. त्याच्या बॅटींगचा फ्लो मला आवडतो. मला त्याची बॅटींग पाहयला खूप आवडते.'' असे गावसकरांनी यावेळी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन असलेला डीव्हिलियर्स 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सध्या तो जगभरातील टी20 लीगमध्ये खेळतो. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) तो महत्त्वाचा सदस्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Sunil gavaskar