नवी दिल्ली, 29 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics 2020) 91 किलो वजनगटातील बॉक्सिंग स्पर्धेचा (Boxing matches Olympics) फायनल-16 राऊंड पार पडला. यात भारताच्या सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला नमवत क्वार्टर फायनलमध्ये (Satish Kumar Olympics) प्रवेश केला आहे. 4-1 अशा मोठ्या फरकाने सतीशने हा सामना खिशात घातला. पहिला राऊंड 5-0 ने जिंकल्यानंतर, सतीशने दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 4-1 ने विजय मिळवला. आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी सतीशला केवळ एक टप्पा ओलांडायचा (Satish Kumar in Quarter Finals) आहे. दरम्यान, या ऑलिम्पिकमध्ये फायनल-8 राऊंडमध्ये पोहोचणारा तिसरा बॉक्सर ठरला आहे.
एशियन गेम्समध्ये दोन वेळा कांस्यपदक मिळवलेला सतीश सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. त्यातच रिकार्डो ब्राऊनच्या खराब फुटवर्कचाही सतीशला (Satish Kumar Ricardo Brown match) फायदा झाला. उजव्या हाताने सलग पंच करत सतीशने ब्राऊनला कसलीच संधी दिली नाही. ब्राऊनने यातच बऱ्याच चुकाही केल्या. तसेच, ब्राऊनला एकही स्ट्राँग पंच मारता आला नाही. मात्र, सामन्यादरम्यान सतीशच्या डोक्याला थोडेसे खरचटले. रिकार्डो आणि सतीश पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे, जमैकाकडून 1996 नंतर पहिल्यांदाच एखादा बॉक्सर (Jamaica Boxer) ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभामध्ये रिकार्डो ब्राउन जमैकाचा ध्वजवाहक होता.
हे वाचा-भारताने गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाला चारली धूळ, क्वार्टर फायनलमध्ये धडक
सतीशचा पुढचा सामना उझबेकिस्तानचा खेळाडू बखोदिर जलोलोव (Bakhodir Jalolov) याच्याविरुद्ध असणार आहे. अजरबैझानचा खेळाडू मोहम्मद अब्दुल्लायेव याला 5-0 ने नमवत बखोदिरने क्वार्टर फायनल्समध्ये प्रवेश केला आहे. बखोदिर हा सध्याचा एशियन आणि वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये नवीनच असलेला सतीश त्याला कसा सामोरा जातो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
उत्तर प्रदेशशातील बुलंदशहरात राहणारा सतीश कुमार पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये सतीश हा भारताचा सर्वात जास्त वजनी गटात खेळणारा बॉक्सर आहे. भारतीय लष्करात नायब सुभेदार म्हणून कार्यरत असणाऱ्या सतीशने एशियन गेम्स 2014 मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. तसेच, सतीशने एशियन चॅम्पियनशिप 2015 आणि 2019 मध्ये कांस्य पदक मिळवले आहे. सतीशने 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं आहे.
हे वाचा-Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान
दरम्यान, टोकयो ऑलिम्पिकमध्ये क्वार्टर फायनल्समध्ये पोहोचलेला सतीश हा भारताचा तिसरा बॉक्सर आहे. यापूर्वी मेरी कोम (Mary Kom) आणि पूजा राणीही (Pooja Rani) क्वार्टर फायनल्समध्ये पोहोचल्या आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Boxing champion, Olympic, Olympics 2021