मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics: दीपिका कुमारीचा अचूक 'लक्ष्य भेद', थरारक लढतीमध्ये विजय

Tokyo Olympics: दीपिका कुमारीचा अचूक 'लक्ष्य भेद', थरारक लढतीमध्ये विजय

टोकयो ऑलिम्पिक्सचा (Tokyo Olympics 2020) सहावा दिवस भारतीय महिलांनी गाजवला आहे. भारताची अनुभवी तिरंदाज दीपिका कुमारीनं (Deepika Kumari) थरारक लढतीमध्ये विजय मिळवत महिला एकेरी स्पर्धेतील पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 28 जुलै: टोकयो ऑलिम्पिक्सचा (Tokyo Olympics 2020) पाचवा दिवस भारतीय महिलांनी गाजवला आहे. बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) दुसऱ्या फेरीत सरळ गेममध्ये विजय मिळवला. त्यानंतर 75 किलो वजनी गटामधील बॉक्सिंगमध्ये पूजा राणीनं (Pooja Rani) 5-0 असा मोठा विजय मिळवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. त्यापाठोपाठ भारताची दिग्गज नेमबाज दीपिका कुमारीनं (Deepika Kumari) शेवटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळवत महिला एकेरी स्पर्धेतील पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.

दीपिका कुमारी विरुद्ध अमेरिकेची जेनफिर मुसीनो-फर्नांडिस (Jennifer Mucino-Fernandez) यांच्यातील  राऊंड 16 मधील लढत जोरदार रंगली. दीपिकाची या मॅचमध्ये सुरुवात खराब झाली. दीपिकानं पहिला सेट 25-26 असा गमावला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये तिनं पुनरागमन करत तो सेट 28-25 नं जिंकला. या सेटमध्ये दीपिकानं दोन वेळा पूर्ण 10 पॉईंट्स मिळवले. दीपिकानं तिसरा सेट देखील 27-25 असा जिंकत मॅचमध्ये 4-2 नं आघाडी घेतली.

त्यानंतर चौथ्या सेटमध्ये जेनिफरनं खेळ उंचावला. जेनिफीरनं हा सेट 25-24 असा जिंकला. पाचव्या आणि अखेरच्या सेटमध्ये अनुभवी दीपिकानं पुन्हा एकदा बाजी मारत ही मॅच जिंकली. शेवटच्या सेटमध्ये दीपिकानं 9,9 आणि 8 असे एकूण 26 पॉईंट्स मिळवले. तर मारियानं 8,8,आणि 9 पॉईंट्सची कमाई करत 25 पॉईंट्सची कमाई केली.

Tokyo Olympics: बॉक्सर पूजा राणीचा विजयी पंच, मेडल जिंकण्यासाठी एका विजयाची गरज

दीपिकानं यापूर्वी पहिल्या फेरीत भूतानच्या की कर्माचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला आहे. त्यानंतर राऊंड ऑफ 16 मध्ये जेनफिरनं जबरदस्त खेळ करत तिला चांगलेच झुंजावले. तिरंदाजीमध्ये प्रवीण जाधव आणि तरुणदीप रॉय यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता दीपिका कुमारी आणि अंतनू दास या दोघांवरच भारताच्या पदकाच्या आशा अवलंबून आहेत.

First published:

Tags: Olympics 2021, Sports