मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics, Badminton: क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या Yamaguchi शी सिंधूची लढत, पदकाची आशा कायम

Tokyo Olympics, Badminton: क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या Yamaguchi शी सिंधूची लढत, पदकाची आशा कायम

भारतीय बॅडमिंटनपटू (Badminton) पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu) हिने टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) डेन्मार्कच्या (Denmark) मिया ब्लिचफेल्टला (Mia Blithfelt) हरवलं आहे. आता सिंधूच्या पुढच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे..

भारतीय बॅडमिंटनपटू (Badminton) पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu) हिने टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) डेन्मार्कच्या (Denmark) मिया ब्लिचफेल्टला (Mia Blithfelt) हरवलं आहे. आता सिंधूच्या पुढच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे..

भारतीय बॅडमिंटनपटू (Badminton) पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu) हिने टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) डेन्मार्कच्या (Denmark) मिया ब्लिचफेल्टला (Mia Blithfelt) हरवलं आहे. आता सिंधूच्या पुढच्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे..

पुढे वाचा ...

    टोकयो, 29 जुलै: भारतीय बॅडमिंटनपटू (Badminton) पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu) हिने टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) डेन्मार्कच्या (Denmark) मिया ब्लिचफेल्टला (Mia Blithfelt) 21-15, 21-13 असं हरवून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या आकेन यामागुची (Akane Yamaguchi) हिच्याशी तिचा सामना होणार आहे.

    शुक्रवारी, 30 जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12 वाजता सिंधू आणि यामागुची यांच्यादरम्यानचा सामना होणार आहे. सिंधू आणि यामागुची या दोघी यापूर्वीही आमनेसामने आल्या असून, त्यांच्यातले सामने रंगतदार झाले आहेत. यामागुची विरुद्ध सिंधूचा 11-7 असा दणदणीत विक्रमी विजय आहे. या दोघी अलीकडेच समोरासमोर आल्या होत्या त्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये. तब्बल 76 मिनिटं रंगलेल्या त्या मॅचमध्ये सिंधूने यामागुचीला नमवून सेमी-फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला होता. त्याआधीच्या या दोघींमधल्या तीन सामन्यांमध्ये सिंधूला तिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. गेल्या काही वर्षांतली यामागुचीची कामगिरीही उत्तम असून, BWF रँकिंगमध्ये तिचा क्रमांक पाचवा आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमधल्या त्यांच्या दोघींमधल्या मॅचमध्ये जी कोणी जिंकेल, ती सुवर्णपदकाची दावेदार असेल.

    हे वाचा-Tokyo Olympics मध्ये मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंचा भारतीय रेल्वेकडून होणार सन्मान

    डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टविरुद्ध आज झालेल्या मॅचमध्ये सिंधूने चांगली सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये ती एकदा 11-6ने आघाडीवर होती. त्यानंतर स्कोअर 13-10 झाला. त्यानंतर 16-12 स्कोअरनंतर मियाने पुनरागमन केलं आणि स्कोअर 16-15 झाला. त्यानंतर सिंधूने 21-15ने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही सिंधूने सुरुवातीपासूनच चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं आणि शेवटी विजय संपादन केला. टोकयो ऑलिम्पिकमधला पी. व्ही. सिंधूचा हा सलग तिसरा विजय आहे.

    हे वाचा-भारताने गोल्ड मेडलिस्ट अर्जेंटिनाला चारली धूळ, क्वार्टर फायनलमध्ये धडक

    पी. व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं होतं. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती सुवर्णपदक जिंकण्यास नक्कीच आतुर असेल. या स्पर्धेतला आतापर्यंतचा तिचा प्रवास अत्यंत प्रभावी असून, स्पर्धा संपेपर्यंत तिचा हाच फॉर्म कायम राहील अशी अपेक्षा आहे. 2012 साली सायना नेहवालने (Saina Nehwal) कास्यपदक जिंकलं होतं. भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली बॅडमिंटनपटू ठरली होती. त्यानंतरच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक (Silver Medal) मिळवलं होतं. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची आशा सिंधूकडून आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतासाठी आतापर्यंत केवळ वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनेच एक पदक जिंकलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Olympic, Olympics 2021