टोकयो, 28 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) भारताची पदकाची प्रबळ दावेदार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिची विजयी कामगिरी सुरु आहे. सिंधूनं बुधवारी सकाळी झालेल्या दुसऱ्या लढतीमध्ये हाँगकाँगच्या चीयूंग नगन यीचा 21-9, 21-16 असा सरळ गेममध्ये पराभव केला आहे. टोकयोत भारताच्या अन्य बॅडमिंटनपटूनं निराशा केल्यानंतर सिंधूच्या या विजयानं फॅन्सना दिलासा मिळाला आहे. या मॅचमध्ये पहिल्या गेमममध्ये दोन्ही खेळाडूंनी सुरुवात सावध केली. पहिल्या गेममध्ये स्कोर 2-2 असा बरोबरीत होता. त्यानंतर अनुभवी सिंधूनं खेळ उंचावला. तिनं हाँगकाँगच्या खेळाडूला कोणतीही संधी न देता पहिला गेम 21-9 असा मोठ्या फरकानं जिंकला. चीयूंगनं दुसऱ्या गेममध्ये थोडा प्रतिकार केला. तिनं 2-6 अशी पिछाडी भरून काढली आणि एक पॉईंट्सची आघाडी देखील मिळवली. त्यानंतरच्या टप्प्यातही चीयूंगनं चांगला प्रतिकार केला. मात्र सिंधूच्या प्रतिहल्ल्यापुढं ती फार कमाल करु शकली नाही. सिंधूनं शेवटच्या टप्प्यात सर्वोत्तम खेळ करत दुसऱ्या गेमसह मॅच देखील जिंकली.
PV Sindhu is through to Pre-QF of Women's Singles 🇮🇳
— The SportsGram India (@SportsgramIndia) July 28, 2021
She beats Ngan Yi 21-9 21-16. Up next in Pre-QF - Mia Blichfeldt.#Badminton | #Tokyo2020 | #TeamIndia pic.twitter.com/zfr1u6Ng4h
स्मृती मंधानानं केली धोनीची बरोबरी, इंग्लंडमध्ये भारतीयांचा जलवा रियो ऑलिम्पिक स्पर्धेत (Rio Olympics) सिल्व्हर मेडलची कमाई करणाऱ्या सिंधूचा या ऑलिम्पिकमधील दुसरा विजय आहे. सिंधूनं पहिल्या फेरीत स्रायलच्या पोलीकरपोवाचा 21-7, 21-10 असा दोन सरळ गेममध्ये पराभव केला होता.