लंडन, 28 जुलै : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या The Hundred स्पर्धेत भारतीय खेळाडूंची जबरदस्त कामगिरी होत आहे. जेमिमा रोड्रिग्सनं (Jemimah Rodrigues) या स्पर्धेत सलग दोन अर्धशतक झळकावले आहेत. त्यापाठोपाठ आता भारताची ओपनिंग बॅटर स्मृती मंधानानं (Smriti Mandhana) देखील या स्पर्धेत जलवा दाखवला आहे. या स्पर्धेत मंधाना साऊदर्न ब्रेव्ह वूमन (Southern Brave Women) टीमकडून खेळत आहे. मंधानानं वेल्स फायर वूमन (Welsh Fire Women) बॉलर्सची जोरदा धुलाई करत टीमला विजय मिळवून दिला आहे. स्मृतीनं फक्त 39 बॉलमध्ये 61 रन काढले. या खेळीत तिनं 5 फोर आणि 3 सिक्स लगावले. तिचा या स्पर्धेतील स्ट्राईक रेट 156 पेक्षा जास्त होता. विशेष म्हणजे स्मृतीनं यावेळी टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) प्रमाणे सिक्स लगावत टीमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. 100 बॉलच्या या लढतीमध्ये वेल्स फायरनं पहिल्यांदा बॅटींग करताना फक्त 110 रन काढले. हॅली मॅथ्यूजनं 20 बॉलमध्ये 33 रन काढले. मात्र तिला इतरांची साथ मिळाली नाही, अमांडा टेलर आणि लॉरेन बेल यांनी 2-2 विकेट्स घेतल्या. 111 रनचा पाठलाग करताना साऊदर्न ब्रेव्हची सुरुवात खराब झाली. ओपनर डेनियल व्हॅट 9 बॉलमध्ये 12 रन काढून आऊट झाली. डॅनियल आऊट झाल्यानंतर स्मृती मंधानानं खेळाची सूत्रं हाती घेतली. स्मृतीनं फक्त 35 बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. या मॅचमधील तीन्ही सिक्स स्मृतीनं लगावले. तिच्या खेळाच्या जोरावर साऊदर्न वेव्हनं फक्त 2 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 16 बॉल राखत विजय मिळवला. स्मृती या स्पर्धेतील पहिल्या मॅचमध्ये शून्यावर आऊट झाली होती. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये तिनं जोरदार खेळ केला आहे. टीम इंडियाला मोठा दिलासा, कृणालच्या संपर्कात आलेल्या 8 खेळाडूंची टेस्ट निगेटिव्ह! भारतीयांचा जलवा इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड स्पर्धेत भारतीयांची दमदार कामगिरी सुरू आहे. जेमिमा रोड्रीग्सनं 2 मॅचमध्ये 152 रन काढले आहेत. ती सध्या टॉपवर आहे. हरमनप्रीत कौरनं देखील 2 मॅचमध्ये 78 रन काढले आहेत. त्या यादीत आता स्मृतीनं देखील जागा मिळवली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.