मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Tokyo Olympics: महाराष्ट्राचा प्रवीण जाधव पराभूत, दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात

Tokyo Olympics: महाराष्ट्राचा प्रवीण जाधव पराभूत, दुसऱ्या फेरीत आव्हान संपुष्टात

टोकयो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) भारताच्या प्रवीण जाधवचे (Pravin Jadhav) तिरंदाजीमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

टोकयो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) भारताच्या प्रवीण जाधवचे (Pravin Jadhav) तिरंदाजीमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

टोकयो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) भारताच्या प्रवीण जाधवचे (Pravin Jadhav) तिरंदाजीमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

  • Published by:  News18 Desk

टोकयो, 28 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमधून (Tokyo Olympics) भारताच्या प्रवीण जाधवचे (Pravin Jadhav) तिरंदाजीमधील आव्हान संपुष्टात आले आहे. तिरंदाजीधील (Archery) पुरुषांच्या एकेरीमध्ये प्रवीणचा दुसऱ्या फेरीत पराभव झाला. वर्ल्ड नंबर 1 अमेरिकेचा तिरंदाज ब्रॅडी विल्सन याने त्याचा सरळ सेटमध्ये पराभव केला.

प्रवीणनं पहिल्या दोन सेटमध्ये चांगला खेळ केला. मात्र या दोन्ही सेटमध्ये निर्णायक क्षणी केलेल्या चुका त्याला नडल्या. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये मात्र ब्रॅडीनं त्याचा सारा अनुभव पणाला लावत प्रवीणला संधी दिली नाही. प्रवीणनं पहिल्या फेरीत  रशियाचा वर्ल्ड नंबर दोन खेळाडू गालसनला हरवले होते. त्यानं गालसनचा 6-0 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. गालसनचा पराभव केल्यानं प्रवीणबद्दल मोठी आशा निर्माण केली होती. मात्र तो पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करू शकला नाही. तिरंदाजीमधील पुरुषांच्या दुहेरीत आणि मिश्र दुहेरीत देखील प्रवीणचं आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले.

सातारा जिल्ह्यातील प्रवीणच्या संघर्षाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती. 'प्रवीण सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतो. तो एक महान तिरंदाज आहे. त्याचे आई-वडील मजुरी करुन कुटुंब चालवतात. त्यांचा मुलगा आता टोक्यो ऑलिम्पिकला जात आहे. ही फक्त त्याच्या आई-वडिलांसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे," या शब्दात पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमात त्याचा गौरव केला होता.

'...तर एका वर्षात बुमराहचा खेळ खल्लास!' शोएब अख्तरचा टीम इंडियाला गंभीर इशारा

तिरंदाजीमध्ये भारताच्या तरुणदीप रॉयचा पहिल्याच फेरीत पराभव झाला होता. त्यामुळे आता दीपिका कुमारीवर भारताच्या पदकाच्या सर्व आशा आहेत.

First published:

Tags: Olympics 2021