Home /News /sport /

'...तर एका वर्षात बुमराहचा खेळ खल्लास!' शोएब अख्तरचा टीम इंडियाला गंभीर इशारा

'...तर एका वर्षात बुमराहचा खेळ खल्लास!' शोएब अख्तरचा टीम इंडियाला गंभीर इशारा

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहबद्दल (Jasprit Bumrah) पाकिस्तानचा फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) गंभीर इशारा दिला आहे.

    मुंबई, 28 जुलै: टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) बॉलिंग अ‍ॅक्शनची नेहमी चर्चा होत असते. बुमराहला त्याच्या बॉलिंग अ‍ॅक्शनमुळे दुखापतग्रस्त होण्याचा धोका जास्त आहे, असं मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं आहे. आता बुमराहाबद्दल पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) टीम इंडियाला गंभीर इशारा दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून बुमराहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय. त्याचा फॉर्म 2019 पासून घसरला आहे. पाठीला झालेल्या दुखापतीनंतर त्याचा प्रभाव कमी झालाय. मागील महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही (WTC Final) बुमराह अपयशी ठरला होता. बुमराहानं दीर्घकाळ क्रिकेट खेळावं असं वाटत असेल तर त्याला मर्यादीत मॅचमध्ये उतरवले पाहिजे, असा सल्ला अख्तरनं दिला आहे. अख्तरनं 'स्पोर्ट्स तक' शी बोलताना सांगितले की, 'बुमराहच्या बॉलिंग अ‍ॅक्शनमुळे त्याच्या पाठीवर आणि खाद्यांवर मोठा भार पडतो. आम्ही लेग-साईड ऑननंबॉलिंग करत असू. त्यामुळे आमच्या पाठीवर आणि खांद्यावर इतका जोर पडत नसे. बुमराहला ती सवलत नाही. त्यामुळे एकदा पाठ आणि कंबरेला दुखापत झाली की त्याला काहीही करता येणार नाही. वेस्ट इंडिजचा इयन बिशप (Ian Bishop) आणि न्यूझीलंडच्या शेन बॉन्डच्या (Shane Bond) यांना झालेला त्रास मी स्वत: पाहिला आहे. बुमराहानं आता त्याच्या वर्कलोडवर काम केले पाहिजे.' अख्तर पुढे म्हणाला की, 'बुमराहला प्रत्येक मॅचमध्ये खेळवलं तर त्याची कारकिर्द वर्षभरातच संपेल. एखाद्या मालिकेत पाच सामने असतील तर त्याला त्यापैकी तीन सामन्यातच खेळवलं पाहिजे. बुमराहनं जास्त कळ क्रिकेट खेळावं अशी इच्छा असेल तर टीम इंडियाला हा उपाय करावा लागेल.' असं अख्तरनं स्पष्ट केलं. सचिन तेंडुलकर करणार रत्नागिरीच्या दीप्तीची मदत, गावातील पहिली डॉक्टर होण्याचं स्वप्न होणार पूर्ण बुमराहची आंतरराष्ट्रीय कारकिर्द बुमरहा सध्या टीम इंडियाबरोबर इंग्लंडमध्ये आहे. त्याने 2016 साली वन-डे आणि टी20 मध्ये पदार्पण केले. तर 2018 साली तो पहिली टेस्ट खेळला. बुमराहनं आजवर टीम इंडियासाठी 20 टेस्ट, 67 वन-डे आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं अनुक्रमे 108, 83 आणि 59 विकेट्स घेतल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: England, India, Jasprit bumrah

    पुढील बातम्या