जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये डौलानं फडकला तिरंगा, भारतीय पथकाला पंतप्रधानांची मानवंदना

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये डौलानं फडकला तिरंगा, भारतीय पथकाला पंतप्रधानांची मानवंदना

Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये डौलानं फडकला तिरंगा, भारतीय पथकाला पंतप्रधानांची मानवंदना

टोकयो ऑलिम्पिकमधील (Tokyo Olympics) उद्घाटन कार्यक्रमात भारतीय खेळाडूच्या पथक कधी येणार याची सर्व देशाला उत्सुकता होती. भारतीय पथक टीव्हीवर दिसताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) यांनी या पथकाला मानवंदना दिली.

  • -MIN READ
  • Last Updated :

टोकयो, 23 जुलै : टोकयो ऑलिम्पिकमधील  (Tokyo Olympics) उद्घाटन कार्यक्रमात भारतीय खेळाडूच्या पथक कधी येणार याची सर्व देशाला उत्सुकता होती. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे हा कार्यक्रम स्टेडियममध्ये उपस्थित टोकयोतील नॅशनल स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या शिवाय झाला. भारतीय टीम तिरंगा घेऊन स्टेडियममध्ये आली तो क्षण सर्वांसाठी अभिमानाचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. मोदींनी ट्विटर अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये मोदी भारतीय दल टीव्हीवर दिसताच उभं राहून टाळ्या वाजवताना दिसत आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. भारतीय पथकाचे ध्वजवाहक ऑलिम्पिक मेडल विजेती बॉक्सर मेरी कोम  (Mary Kom) आणि पुरूष हॉकी टीमचा कॅप्टन मनप्रीत सिंह (Manpreet Singh) होते. जपानी बाराखडीप्रमाणे भारतीय पथकाला 21 वा क्रमांक मिळला होता. ‘आपण सर्वजण भारतीय टीमचा उत्साह वाढवू या. टोकयो 2020 उद्घाटन कार्यक्रम काही संक्षिप्त दृश्य पाहिली. आपल्या पथकाला शुभेच्छा. त्याचबरोबर पंतप्रधानांनी #Cheer4India हा हॅशटॅग वापरला आहे.

News18

कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे यंदा एक वर्ष उशीरा ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे.  यंदा कोरोनामुळे जगभरातील फक्त 1000 खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. IND vs SL : सूर्यकुमार यादव आऊट होण्यापूर्वीच श्रीलंकेचा जल्लोष, पाहा VIDEO भारतीय ऑलिम्पिक पथकात यंदा 124 खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 69 पुरुष तर 55 महिला आहेत. एकूण 85 गोल्ड मेडलसाठी भारतीय खेळाडू त्यांची दावेदारी या स्पर्धेत सादर करणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात