टोकयो, 24 जुलै : भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) शनिवारी टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास रचला. मीराबाईनं वेटलिफ्टिंगमधील 49 किलो वजनी गटामध्ये सिल्व्हर मेडल जिंकले. (Mirabai Chanu wins silver in Weightlifting Women's 49kg category) मीराबाईच्या या यशानं संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी मीराबाई ही पहिली भारतीय महिला आहे. या यशाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी तिचे अभिनंदन केले आहे. 'वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकत टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताचे खाते उघडल्याबद्दल मीराबाई चानूचं अभिनंदन' असं ट्विट राष्ट्रपतींनी केलं आहे.
Heartiest congratulations to Mirabai Chanu for starting the medal tally for India in the Tokyo Olympics 2020 by winning silver medal in weightlifting.
— President of India (@rashtrapatibhvn) July 24, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मीराबाईचं अभिनंदन करताना तिच्यासोबतचा जुना फोटो शेअर केला आहे. 'टोकयो ऑलिम्पिकची यापेक्षा चांगली सुरूवात होऊ शकत नाही. मीराबाई चानूच्या दमदार कामगिरीमुळे संपूर्ण देशात उत्साह आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुझं यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारं आहे.'असं ट्विट मोदींनी केलं असून त्याचबरोबर त्यांनी #Cheer4India हा हॅशटॉग देखील वापरला आहे.
Could not have asked for a happier start to @Tokyo2020! India is elated by @mirabai_chanu’s stupendous performance. Congratulations to her for winning the Silver medal in weightlifting. Her success motivates every Indian. #Cheer4India #Tokyo2020 pic.twitter.com/B6uJtDlaJo
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2021
चानूची चॅम्पियन बनण्याची कहाणी! मणिपूरची मीराबाई कशी ठरली भारताची 'सिल्व्हर गर्ल'
वेटलिफ्टिंगमधील भारताचं हे दुसरं मेडल आहे. यापूर्वी सिडनीमध्ये 2000 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये करनाम मल्लेश्वरीनं ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. त्यानंतर 21 वर्षांनी चानूनं ही प्रतीक्षा संपवली आहे. ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी चानू ही पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021