मुंबई, 24 जुलै : वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले मेडल जिंकले. तिने शनिवारी वेटलिफ्टिंगमधील 49 किलो वजनी गटात सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचला. या खेळात ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई करणारी ती पहिली भारतीय आहे. या विजयानं संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक दिग्गजांनी तिचं अभिनंदन केलं आहे. मीराबाईनं मेडल जिंकल्यानं तिच्या घरी देखील जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले.
वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील भारताचं हे दुसरं ऑलिम्पिक मेडल आहे. यापूर्वी करनाम मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिम्पिकमध्ये (2000) ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. मीराबाईनं यंदा सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. तिने स्नॅच गटात 87 तर क्लीन एंड जर्क गटात 115 असे एकूण 202 किलो वजन उचलले. चीनची वेटलिफ्टर हाऊ झिहूनं एकूण 210 किलो वजन उचलत गोल्ड मेडल पटकावलं.
या विजयानंतर इंफाळमधील तिच्या घरी आनंदाचं वातावरण होते. एनएनआय (ANI) या वृत्तसंस्थेनं त्याची एक क्लिप प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये तिच्या घरातील सर्व मंडळी टीव्हीवर ही स्पर्धा पाहत होते. मीराबाईनं मेडल जिंकताच त्यांनी आनंद व्यक्त केला. 'आम्ही खूप खूश आहोत. हे सर्व मीराबाईच्या कष्टाचं फळ आहे. मणिपूरचं नाही तर संपूर्ण देशाला तिचा अभिमान आहे,' अशी प्रतिक्रिया तिच्या एका नातेवाईकाने व्यक्त केली.
#WATCH | Manipur: Family and neighbours of weightlifter Mirabai Chanu burst into celebrations as they watch her win the #Silver medal for India in Women's 49kg category. #OlympicGames pic.twitter.com/F2CjdwpPDc
— ANI (@ANI) July 24, 2021
2 मुंबईकर इंग्लंडला जाणार, रवी शास्त्रींशी चर्चेनंतर निवड समितीचा निर्णय
मीराबाई चानूला रियो ऑलिम्पिकमध्ये अपयश आले होते. या अपयशानंतर तिने जिद्दीनं पुनरागमन केलं. मागील पाच वर्षात सर्व प्रमुख स्पर्धांमध्ये तिनं मेडल जिंकले होते. आता टोकयोमध्येही सिल्व्हर मेडल जिंकत सर्व भारतीयांना खूप मोठा आनंद देण्याचं काम तिनं केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021