मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : 2 मुंबईकर इंग्लंडला जाणार, रवी शास्त्रींशी चर्चेनंतर निवड समितीचा निर्णय

IND vs ENG : 2 मुंबईकर इंग्लंडला जाणार, रवी शास्त्रींशी चर्चेनंतर निवड समितीचा निर्णय

इंग्लंड दौऱ्यात जखमी झालेल्या खेळाडूंची जागा घेण्यासाठी ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि मिडल ऑर्डर बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोन मुंबईकर इंग्लंडला जाणार हे निश्चित झाले आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 जुलै : इंग्लंड दौऱ्यात जखमी झालेल्या खेळाडूंची जागा घेण्यासाठी ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि मिडल ऑर्डर बॅट्समन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोन मुंबईकर इंग्लंडला जाणार हे निश्चित झाले आहे. इंग्लंड दौऱ्यातील तीन खेळाडू जखमी झाल्यानंतर या दोघांना बदली खेळाडू म्हणून पाठवण्यात येणार आहे.  इंग्लंड दौऱ्यावरील शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर हे तीन खेळाडू जखमी झाल्यानं इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमधून बाहेर झाले आहेत. त्यानंतर या खेळाडूंची मागणी टीम मॅनेजमेंटनं केली होती. त्यानंतर ती मागणी मान्य करण्यात आली आहे.

'क्रिकबझ' मधील वृत्तानुसार सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यींचे नाव निश्चित झाले आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्याशी चर्चा केल्यानंतर चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या निवड समितीनं ही नावं निश्चित केली आहेत. टीम मॅनेजमेंटनं एकूण 3 खेळाडूंची मागणी केली आहे. मात्र यामधील तिसरे नाव अद्याप नक्की झालेले नाही.

शुभमन गिल जखमी झाल्यानंतर लगेच टीम इंडियानं पृथ्वी शॉची मागणी केली होती. त्यावेळी निवड समितीनं नकार दिला होता. आता जखमी खेळाडूंची संख्या वाढल्यानं निवड समितीला ही मागणी मान्य करावी लागली. सूर्यकुमार यादवनं याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंड विरुद्धच्या टी20 मालिकेत चांगली  कामगिरी केल्यानंतर त्यानं श्रीलंका विरुद्धच्या वन-डे मालिकेतही दमदार प्रदर्शन केलं आहे. याच सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली आहे.

Mirabai Chanu: एका VIDEO CLIP बदललं आयुष्य, मीराबाईची सवय वाचून वाटेल अभिमान

टीम मॅनेजमेंटनं मागणी केलेला तिसरा खेळाडू जयंत यादव हा हरयाणाचा आहे. मात्र तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सदस्य आहे. जयंत यादव हा उत्तम बॅटींगसाठीही ओळखला जातो. इंग्लंड विरुद्ध मुंबईमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्यानं शतक देखील झळकावलं आहे. जयंत टीम इंडियाकडून  4 टेस्ट खेळला असून 2017 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो शेवटची टेस्ट खेळला आहे. जयंत यादवच्या बॅटींग करण्याच्या क्षमतेमुळेच सुंदरच्या जागेवर टीम इंडियानं त्याची मागणी केली आहे, असं वृत्त काही माध्यमांनी दिली आहे.

First published:

Tags: Cricket news, India vs england, Prithvi Shaw, Suryakumar yadav