टोकयो, 30 जुलै: भारताची अनुभवी बॉक्सर मेरी कोमचं (Mary Kom) टोकयो ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मात्र तिच्या पराभवानंतर (Mary Kom Controversy) नवा वाद सुरु झाला आहे. आपल्याला मॅचनंततर तब्बल दोन तासांनी पराभवाबद्दल समजलं, असा धक्कादायक खुलासा मेरीनं केला आहे. मेरी कोमनं यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर (IOC) खराब रेफ्रींची नियुक्ती केल्याचा आरोप केला आहे.
मेरीचा कोलंबियाच्या इनग्रिट वेलेंसिायाकडून 2-3 असा पराभव झाला. या मॅचमध्ये मेरीनं शेवटचे दोन राऊंड जिंकल्यानंतरही ती पराभूत झाली. 'मी बॉक्सिंग रिंगमध्ये आनंदी होते. मी जिंकले अशी माझी समजूत झाली होती. ते मला डोपिंग टेस्टसाठी घेऊन गेले त्यावेळी देखील मला तसेच वाटत होते. मॅचनंतर मी सोशल मीडियावर पाहिलं. त्यामंतर माझ्या कोचला विचारले त्यावेळी मी पराभूत झाल्याचं मला समजलं. मी त्या मुलीला दोनदा पराभूत केले आहे. मॅच संपल्यानंतर रेफ्रींनी माझा हात उंचावला होता. त्यानंतरही मी हरले, यावर माझा विश्वास बसत नाही.' अशी भावना मेरी कोमनं व्यक्त केली आहे.
लगेच निवृत्ती नाही!
'रेफ्रींच्या निर्णयाला विरोध करण्याचा किंवा त्या विरोधात दाद मागण्याची कोणतीही संधी नाही. दुसऱ्या राऊंडमध्ये माझ्या बाजूने 5-0 असा निकाल लागयला हवा होता. तरीही तो 3-2 असा लागला. हे जे काही घडलं आहे, ते धक्कादायक आहे. एका मिनिटात किंवा अगदी एका सेकंदामध्ये खेळाडूला सर्व काही माहिती होते.
लवलीनानं मृत्यूच्या दाढेतून आईला काढलं बाहेर, बॉक्सिंगही लावलं पणाला! 6 महिन्यात बनली दुसरी मेरी कोम
मी आता ब्रेक घेणार आहे. काही वेळ कुटुंबासोबत घालवणार आहे. मात्र खेळ सोडणार नाही. यापूढील काळात कोणती स्पर्धा झाली तर मी त्यामध्ये उतरेल,' असं मेरीनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Olympics 2021