मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics: लवलीनानं मृत्यूच्या दाढेतून आईला काढलं बाहेर, बॉक्सिंगही लावलं पणाला! 6 महिन्यात बनली दुसरी मेरी कोम

Tokyo Olympics: लवलीनानं मृत्यूच्या दाढेतून आईला काढलं बाहेर, बॉक्सिंगही लावलं पणाला! 6 महिन्यात बनली दुसरी मेरी कोम

भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेननं (Lovlina Borgohain) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) दुसरं मेडल नक्की केलं आहे. लवलीनानं आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी बॉक्सिंग पणाला लावले होते.

भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेननं (Lovlina Borgohain) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) दुसरं मेडल नक्की केलं आहे. लवलीनानं आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी बॉक्सिंग पणाला लावले होते.

भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेननं (Lovlina Borgohain) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) दुसरं मेडल नक्की केलं आहे. लवलीनानं आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी बॉक्सिंग पणाला लावले होते.

टोकयो, 30 जुलै: भारताची महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेननं (Lovlina Borgohain) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) दुसरं मेडल नक्की केलं आहे. लवलीनानं 69 किलो ग्रॅम वेल्टवेट गटात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तिचे किमान ब्रॉन्झ मेडल नक्की झाले आहे . लवलीनानं सेमी फायनलमध्ये चीनच्या निएन चिन चेनचा 4-1 नं पराभव केला. यापूर्वी लंडनमध्ये 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमनं (Mary Kom) ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. त्यानंतर ऑलिम्पिक मेडल पटकावणारी लवलीना ही दुसरी महिला बॉक्सर बनली आहे.  सहा महिन्यांपूर्वी आईला मृत्यूच्या दाढेतून वाचवणाऱ्या लवलीनानं पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे.

बहिणींपासून प्रेरणा

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यातील लवलीनाचे वडील हे छोटे व्यापारी आहेत.  लवलीनाला लिचा आणि निमा या दोन मोठ्या जुळ्या बहिणी आहेत. या दोघी बहिणी किक बॉक्सिंग करतात. त्यांच्यापासून लवलीनानं प्रेरणा घेत किक बॉक्सिंग करण्यास सुरुवात केली. त्यांच्या बहिणींनी किक बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. लवलीना देखील बहिणीप्रमाणेच यामध्ये करिअर करणार असा सर्वांचा अंदाज होता. पण, एका घटनेमुळे तिचं आयुष्य बदललं.

महान बॉक्सरपासून प्रेरणा

'बीबीसी हिंदी' नं दिलेल्या वृत्तानुसार लवलीनाचे वडिलांना एकदा पेपरमध्ये गुंडाळून घरी मिठाई आणली होती. ज्या पेपरमध्ये त्यांनी ही मिठाई आणली त्यावर महान बॉक्सर मोहम्मद अलीचे पोस्टर होते.  हे पोस्टर पाहून लवलीनानं त्यांच्याबद्दल वडिलांना प्रश्न विचारले. त्यानंतर लवलीनाच्या वडिलांनी तिला मोहम्मद अली यांचा इतिहास सांगितला. या इतिसापासून प्रेरणा घेत लवलीनानं बॉक्सिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

लवलीनानं 2012 साली बॉक्सिंग खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर पाच वर्षांमध्येच तिनं एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल पटकावलं. मात्र तिचा हा प्रवास इतका सहज झालेला नाही.

Tokyo Olympics 2020: भारताचे आणखी एक मेडल नक्की! बॉक्सिंगमध्ये लवलीनाची सेमी फायनलमध्ये धडक

6 महिन्यांपूपर्वी आलं होतं वादळ

टोकयो ऑलिम्पिकच्या तयारीत सर्व खेळाडू  गुंतलेले असताना लवलीनाच्या आयुष्यात मात्र वेगळचं वादळ आलं होतं. लवलीनाच्या आईच्या किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन होणार होतं. त्यावेळी लवलीनानं तिचं बॉक्सिंग करिअर पणाला लावून आईची सेवा केली. तिच्या सेवेमुळेच आई बरी झाली.

त्यानंतर लवलीनाच्या कोचिंग स्टाफमधील काही जणांना  कोरोनाची लागण झाली. त्यामुळे लवलीनानं व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. या सर्व अडचणींवर मात करत लवलीनानं ऑलिम्पिकमध्ये मेडल नक्की केलं आहे. भारताच्या मीराबाई चानूनं यापूर्वीच टोकयो ऑलिम्पिकमध्ये  सिल्व्हर मेडल पटकावलं आहे. त्यानंतर लवलीनानं ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

First published:

Tags: Olympic, Olympics 2021, Sports