मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics : मेडलविजेत्या खेळाडूंना सर्वात जास्त कशाची भीती वाटते? पाहा VIDEO

Tokyo Olympics : मेडलविजेत्या खेळाडूंना सर्वात जास्त कशाची भीती वाटते? पाहा VIDEO

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंची सध्या सर्वत्र चर्चा आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.यामध्ये या खेळाडूंनी त्यांच्या आवडीबद्दल माहिती सांगितली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 ऑगस्ट : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंची सध्या सर्वत्र चर्चा आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra), बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडल विजेती लवलीना बोरगोहेन (Lovlina Borgohain) आणि हॉकी टीमचा कॅप्टन मनप्रीत सिंह (Manpreet Singh) यांचा एक रॅपिड फायर राऊंड शेअर केला आहे. यामध्ये या मेडल विजेत्या खेळाडूंनी त्यांच्या आयुष्याशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टींची माहिती दिली आहे.

काय खायला आवडतं?

मनप्रीत सिंहनं या प्रश्नावर बटर चिकन असं उत्तर दिलं. आपल्याला खेकडा खायला आवडतो असं लवलीना म्हणाली. तर नीरज चोप्रानं  मला फळ खायला आवडतं कारण ते शरीराला चांगले असतात, असं सांगितलं.

भीती कशाची वाटते?

आईला खोटं बोललं तर भीती वाटते, अशी कबुली मनप्रीत सिंहनं दिली आहे. मला उंचावर भीती वाटते असं लवलीना म्हणाली. तर अशा कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसल्याचं नीरजनं सांगितलं.

जिंकल्यानंतर पहिला फोन कुणाला?

आपण ऑलिम्पिक मेडल जिंकावं अशी वडिलांची खूप इच्छा होते. पण ते आता जगात नाहीत म्हणून मी आईला सर्वप्रथम फोन केला अशी भावुक आठवण मनप्रीतनं सांगितली. मी आई-वडिलांशी सर्वप्रथम बोलले असं लवलीना म्हणाली. तर आपण आपले सिनिअर जय चौधरींना फोन केल्याचं नीरजने स्पष्ट केले.

RIP English! पाकिस्तानी क्रिकेटपटूनं केला इंग्रजीचा मर्डर, स्वातंत्र्यदिनी केली भयंकर पोस्ट

ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडूंची इनसाईड माहिती सांगणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे.

First published:

Tags: Olympics 2021