मुंबई, 14 ऑगस्ट : पाकिस्तानचे क्रिकेटपटू त्यांच्या इंग्रजीच्या वापरामुळे कायम थट्टेचा विषय असतात. पाकिस्तानचा आज (14 ऑगस्ट) स्वतंत्रता दिवस (Pakistan Independence Day) आहे. या दिवशी सोशल मीडियावर सर्वजण पाकिस्तानचा क्रिकेटपटू कमरान अकमलची (Kamran Akmal) सर्वजण थट्टा करत आहेत. याचं कारण म्हणजे कमरान अकमलचं इंग्रजी आहे.
कमरान अकमलनं ट्विटर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना चुकीचे स्पेलिंग वापरले. त्यामुळे तो सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे. इंडिपेंडन्स शब्दाचं स्पेलिंग त्यानं चुकीचं लिहलं आहे. कमरान अकमलच नाही तर त्याचा भाऊ उमर अकमलच्या इंग्रजीची देखील सोशल मीडियावर अनेकदा थट्टा उडवण्यात आली आहे.
पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन भारताच्या एक दिवस आगोदर म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त पाकिस्तानचे क्रिकेटपटू आणि सेलिब्रेटी सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहे. कमरान अकमल देखील शुभेच्छा देण्याच्या नादात चांगलाच ट्रोल झाला आहे.
1436 किलो मीटर चालत रांचीला आला धोनीचा फॅन, म्हणाला, 'माहीनं स्वप्नात येऊन...'
कमरान अकमल 2017 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. पण तो पाकिस्तानच्या क्रिकेटमध्ये आणि सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Pakistan