• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कॅन्सरवर मात करत जिंकलं Tokyo Olympics मध्ये मेडल, 93 लाखांमध्ये केला लिलाव! वाचा काय आहे कारण

कॅन्सरवर मात करत जिंकलं Tokyo Olympics मध्ये मेडल, 93 लाखांमध्ये केला लिलाव! वाचा काय आहे कारण

पोलंडची भालाफेकपटू ( javelin thrower) मारिया आंद्रेयचकनं (Maria Andrejczyk) ऑलिम्पिक मेडल (Tokyo Olympics 2020) लिलाव केला. तिच्या लिलावाचा निर्णय आश्चर्यकारक असला तरी त्यामागील कारण खास आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑगस्ट : ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणे हे प्रत्येक अ‍ॅथलिटचं स्वप्न असतं. यापैकी काही जणांचेच हे स्वप्न पूर्ण होते. पोलंडची भालाफेकपटू ( javelin thrower) मारिया आंद्रेयचक (Maria Andrejczyk) ही त्यापैकीच एक खेळाडू आहे. मारियानं टोकयो ऑलिम्पकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई केली.  मात्र टोकयोमधून घरी परतल्यानंतर तिनं या मेडलचा लिलाव केला. मारियाचा हा निर्णय आश्चर्यकारक असला तरी याचं कारण खास आहे. काय आहे कारण? मारियानं पोलंडमधील एका मुलाच्या उपचारासाठी तिच्या ऑलिम्पिक मेडलचा ऑनलाईन लिलाव केला. मिलोश्नक मलीसा या 8 महिन्याच्या मुलाला ऱ्हदयाचा गंभीर आजार आहे.त्याच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरू आहे. या उपचारासाठी मोठा खर्च होणार आहे. या उपचाराला मदत म्हणून मारियानं तिच्या मेडलचा लिलाव केला. या प्रकरणात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार या उपचारासाठी जवळपास 2.86 लाख रुपयांची गरज होती. मारियाला हे समजताच तिनं मेडल विकण्याचा निर्णय घेतला. तिनं फेसबुक पोस्ट लिहून मेडलच्या लिलावाचा निर्णय जाहीर केला. ऑलिम्पिक मेडलचा लिलाव करण्याचा तिच्या निर्णयाची सर्वांनी प्रशंसा केली. पोलंडच्या जाबका या सुपरमार्केट चेननं जवळपास 93 लाख रुपयांना हे मेडल खरेदी केले. तसंच त्यांनी देखील या उपचारासाठी काही दान केले. मारियाच्या या लिलावातून मिलोश्चकच्या उपचारासाठी 1 कोटी 43 लाखांची रक्कम जमा झाली. भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस खास, 13 वर्षांपूर्वी सुरू झालं 'विराट पर्व' कॅन्सरवर केली मात ऑलिम्पिक मेडलचा लिलाव करणाऱ्या मारियाचा आजवरचा प्रवास देखील प्रेरणादायी आहे. तीचं 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिचं ब्रॉन्झ मेडल थोडक्यात हुकलं. ती चौथ्या क्रमांकावर होती. त्यानंतर 2018 साली मारियाला हाडाचा कॅन्सर झाला होता. या कॅन्सरवर मात करत ती टोकयो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरली. या ऑलिम्पिकमध्ये 64.61 मीटर लांब भालाफेक करत सिल्व्हर मेडल पटकावले.
  Published by:News18 Desk
  First published: