Home /News /sport /

Tokyo Olympics: महिला हॉकी टीमचा पहिला विजय, पदकाची आशा कायम

Tokyo Olympics: महिला हॉकी टीमचा पहिला विजय, पदकाची आशा कायम

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय आता महिला हॉकी टीमनं (India’s Womens Hockey Team) स्पर्धेतील पहिला विजय नोंदवर मेडलच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

    टोकयो, 30 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमनं क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर आता महिला हॉकी टीमनं (India’s Womens Hockey Team) स्पर्धेतील पहिला विजय नोंदवर मेडलच्या आशा कायम ठेवल्या आहेत. भारतानं शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये आयर्लंडचा 1-0 असा पराभव केला. कॅप्टन राणी रामपालनं (Rani Rampal) दिलेल्या अचूक पासवर नवनीत कौरनं मॅचमधील  एकमेव गोल करत भारताला विजय मिळवून दिला. टोकयो ऑलिम्पिकमधील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक होते. भारतीय टीमनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पण, त्यांना पहिल्या तीन क्वार्टरमध्ये गोल करण्यात यश आले नाही. अखे मॅच संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना नवनीतनं गोल करत भारतीय टीमला विजय मिळवून दिला. भारताला या सामन्यात एकूण 14 पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण आयर्लंडच्या गोल किपरनं जोरदार खेळ करत भारताचे हल्ले परतावले. त्यामुळे भारताला मोठा विजय मिळवता आला नाही. Tokyo Olympics: धक्कादायक! मेरी कोमला 2 तासांनी समजला निकाल, म्हणाली... पदकाची आशा कायम भारतीय महिलांचा या स्पर्धेतील पहिलाच विजय आहे. या विजयानंतर भारताच्या क्वार्टर फायनलच्या आणि पर्यायानं मेडलच्या आशा कायम आहेत. आता  भारतीय टीमची पुढची लढत शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. भारतानं दक्षिण आफ्रिकेचा मोठा पराभव केला आणि आयर्लंडला शेवटच्या सामन्यात ब्रिटननं पराभूत केले तर भारतीय टीम क्वार्टर फायनलमध्ये पोहचू शकेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Olympic, Olympics 2021, Tokyo

    पुढील बातम्या