टोकयो, 26 जुलै: भारताच्या पुरुष टीमनं तिरंदाजी (Archery) स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. प्रवीण जाधव (Pravin Jadhav), अतनू दास (Atanu Das) आणि तरुणदीप राय (Tarundeep Rai) या भारतीय टीमनं कझाकस्तानच्या टीमचा 6-2 असा पराभव केला. भारतीय टीमची पुढील लढत बलाढ्य दक्षिण कोरियाशी होणार आहे. भारताकडून अतनू दासनं जोरदार खेळ करत पाच वेळा परफ्केट 10 पॉईंट्सची कमाई केली. कझाकस्तानचा अव्वल तिरंदाज डेनिस गॅनकीन यानं चांगला खेळ करत सुरुवातीला आघाडी घेतली होती. मात्र, भारतीय टीमनं तात्काळ मॅचमध्ये पुनरागमन करत त्याच्यावर दबाव वाढवला. पराभवानंतरही भवानीचा इतिहास तलवारबाजीमध्ये सहभागी झालेली भारताची एकमेव खेळाडू भवानी देवीनं (Bhavani Devi) इतिहास रचला आहे. भवानीचा दुसऱ्या फेरीत फ्रान्सची वर्ल्ड नंबर 3 मॅनन ब्रुनेटनं 7-15 असं हरवलं. ब्रनुेटनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सेमी फायनल गाठली होती. तर भवानीची ही पहिलीच ऑलिम्पिक स्पर्धा होती. पहिल्याच स्पर्धेत भवानीनं दिग्गज खेळाडूला कडवी लढत देत सर्वांची मन जिंकली.
And history is scripted! 🤺🇮🇳
— The SportsGram India (@SportsgramIndia) July 26, 2021
Bhavani Devi becomes 1st Indian fencer at Olympics. Not just that, she is through to Round of 32.
She comfortably wins her 1st match against Tunisian fencer 15-3#Fencing | #TeamIndia | #Tokyo2020 pic.twitter.com/TuWg0yRygo
IND vs SL, 1st T20 : टीम इंडियाचा दणदणीत विजय, भुवीला सूर गवसला भवानीनं सोमवारची सुरुवात ऐतिहासिक विजयानं केली. तिनं तिनं ट्यूनेशियाच्या नादिया बेनचा 15-3 असा मोठ्या फरकानं पराभव केला. भवानी देवी वर्ल्ड रँकिंगमध्ये 42 व्या क्रमांकावर असून तिला या ऑलिम्पिकमध्ये 29 वे रँकिंग देण्यात आले आहे. भवानीनं या मॅचची सुरुवातच आक्रमक केली. तिने नादीयावर 5-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतरच्या टप्प्यात नादीयानं प्रतिकार करत ही आघाडी 13-3 अशी कमी केली. पण, भवानीच्या आक्रमक खेळापुढे तिचे चालले नाही. भवानीनं मॅच जिंकण्यासाठी आवश्यक असलेले 15 पॉईंट्स सहज पटकावले.

)







