मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SL, 1st T20 : टीम इंडियाचा दणदणीत विजय, भुवीला सूर गवसला

IND vs SL, 1st T20 : टीम इंडियाचा दणदणीत विजय, भुवीला सूर गवसला

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने (India vs Sri Lanka) धमाकेदार विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 126 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे त्यांचा 38 रनने पराभव झाला.

  • Published by:  Shreyas

कोलंबो, 25 जुलै : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाने (India vs Sri Lanka) धमाकेदार विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा 126 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे त्यांचा 38 रनने पराभव झाला. वनडे सीरिजमध्ये संघर्ष करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) टी-20 सीरिजमध्ये सूर गवसला. भुवीने 3.3 ओव्हरमध्ये 22 रन देऊन 4 विकेट घेतल्या, तर दीपक चहरने 2 विकेट मिळवल्या. कृणाल पांड्या, वरुण चक्रवर्ती, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. श्रीलंकेकडून चरीथ असलंकाने सर्वाधिक 44 रन केले. या विजयासोबतच टीम इंडियाने 3 टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

या सामन्यात सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पुन्हा एकदा धमाकेदार बॅटिंग केली. सूर्याने 34 बॉलमध्ये केलेल्या 50 रनच्या खेळीमुळे भारताने श्रीलंकेला (India vs Sri Lanka) विजयासाठी 165 रनचं आव्हान दिलं. 20 ओव्हरमध्ये भारताने 5 विकेट गमावून 164 रनपर्यंत मजल मारली. श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला पहिले बॅटिंगला पाठवलं, यानंतर पहिल्याच बॉलला भारताला धक्का बसला. ओपनर पृथ्वी शॉ शून्य रनवर माघारी परतला. कर्णधार शिखर धवन आणि संजू सॅमसन यांनी भारताचा डाव सावरला, पण संजू सॅमसन 27 रनची चांगली सुरुवात मिळाल्यानंतर आऊट झाला, तर शिखर धवन 46 रन करून माघारी परतला. हार्दिक पांड्याला 12 बॉलमध्ये 10 रन करता आले. इशान किशन 14 बॉलमध्ये 20 रनवर आणि कृणाल पांड्या 3 रनवर नाबाद राहिले. श्रीलंकेकडून दुष्मंता चमिरा आणि वानिंदू हसरंगा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर चामिका करुणारत्नेला एक विकेट घेण्यात यश आलं.

या सामन्यातून पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तिसऱ्या वनडेमध्ये विश्रांती देण्यात आलेले दीपक चहर (Deepak Chahar) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं, तर वनडे सीरिजमध्ये संघर्ष केलेल्या मनिष पांडेला (Manish Pandey) टी-20 मधून बाहेर बसवण्यात आलं.

First published:

Tags: India Vs Sri lanka, T20 cricket