टोकयो, 28 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सध्या जगभरातील अव्वल खेळाडू पदक मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खेळाडूंना पदक मिळणे ही त्यांच्या कोचची सर्वात मोठी जबाबदारी असते. त्यामुळे ते आपल्या शिष्याची कामगिरी चांगली व्हावी, यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. सध्या असाच एक ज्यूडो मॅचमधील कोचचा उपाय सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे. जर्मनी विरुद्ध हंगेरी या महिलांच्या ज्युडो स्पर्धेतील हा व्हिडीओ आहे. जर्मनीची खेळाडू मार्टिन ट्राजडोस स्पर्धेसाठी उतरण्यापूर्वी तिच्या कोचनं आधी तिची कॉलर पकडली आणि नंतर तिच्या थोबाडीत लगावली. जर्मन कोचच्या ट्रेनिंगचा हा अजब व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काही जणांनी या ट्रेनिंगच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केलीय. तर काहींनी त्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘मला सोमवारी सकाळी जागं करण्यासाठी या प्रकारच्या कोचिंगची गरज आहे, अशी प्रतिक्रिया देखील या व्हिडीओवर व्यक्त होत आहे.
This is the coaching I need on Mondays, around 7am #Tokyo2020 pic.twitter.com/b9BeLUfus4
— Andrew Gourdie (@AndrewGourdie) July 27, 2021
मोठी बातमी! हार्दिक, सूर्यकुमारसह ‘हे’ खेळाडू T20 सीरिजमधून आऊट! मार्टिनानं या अनोख्या पद्धतीनंच समर्थन केलं आहे. मॅचपूर्वी जोश निर्माण व्हावा यासाठी मीच कोचना हा उपाय करण्यास सांगितले होते. या प्रकरणात कुणीही त्यांना दोष देऊ नका, असं आवाहन तिनं केलंय. जर्मन कोचचा हा उपाय मार्टिनामध्ये जोश निर्माण करण्यात फारसा उपयोगी ठरला नाही. हंगेरीविरुद्धच्या लढतीत तिचा पराभव झाला. त्यामुळे मार्टिनाचे ऑलिम्पिकमधील आवाहन संपुष्टात आले आहे.