Home /News /sport /

IND vs SL: मोठी बातमी! हार्दिक, सूर्यकुमारसह 'हे' खेळाडू T20 सीरिजमधून आऊट!

IND vs SL: मोठी बातमी! हार्दिक, सूर्यकुमारसह 'हे' खेळाडू T20 सीरिजमधून आऊट!

भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरा टी20 सामना बुधवारी होत आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

    कोलंबो, 28 जुलै: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरा टी20 सामना बुधवारी होत आहे. हा सामना यापूर्वी मंगळवारी होणार होता. मात्र टीम इंडियाचा ऑल राऊंडर  कृणाल पांड्याला (Krunal Pandya) कोरोनाची लागण झाल्यानं सामना एक दिवस पुढं ढकलण्यात आला. बुधवारच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 'इनसाईड स्पोर्ट्स'च्या बातमीनुसार पृथ्वी शॉ  (Prithvi Shaw), हार्दिक पांड्या  (Hardik Pandya), इशान किशन (Ishan Kishan), देवदत्त पडिक्कल आणि कृष्णप्पा गौतम हे भारतीय खेळाडू श्रीलंका विरुद्धची उर्वरित सीरिज खेळणार नाहीत. हे सर्वजण कृणालच्या संपर्कात होते, अशी माहिती आहे. मात्र याबाबत अद्याप एकाही नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कृणालच्या संपर्कात आलेल्या सर्व 8 जणांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मॅच खेळता येणार नाही. सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळालं आहे. शुभमन गिल (Shubhaman Gill), वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) आणि आवेश खान (Avesh Khan) यांना दुखापत झाल्यामुळे हे दोघं श्रीलंका दौऱ्यानंतर इंग्लंडला रवाना होणार आहेत. मात्र कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्यानं आता त्यांचे इंग्लंडला जाणे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. भारतीय बॅडमिंटनचे महर्षी हरपले! नंदू नाटेकर यांचं निधन तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताकडं सध्या 1-0 नं आघाडी आहे. यापूर्वी झालेली वन-डे मालिका टीम इंडियानं 2-1 नं जिंकली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या