जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Tokyo Olympics: अनुष्कानं शेअर केला मीराबाई चानूचा खास photo, कारण वाचून व्हाल भावुक

Tokyo Olympics: अनुष्कानं शेअर केला मीराबाई चानूचा खास photo, कारण वाचून व्हाल भावुक

Tokyo Olympics: अनुष्कानं शेअर केला मीराबाई चानूचा खास photo, कारण वाचून व्हाल भावुक

वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मानं (Anushka Sharma) एक खास फोटो शेअर करत मीराबाईच्या यशाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जुलै:  वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचला आहे. वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटात सहभागी झालेल्या मीराबाईकडून यंदा संपूर्ण देशाला मोठी अपेक्षा होती. मीराबाईनं 202 किलो वजन उचलत ही अपेक्षा पूर्ण केली. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच मेडल मिळालं आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मीराबाईवर देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अभिनेती अनुष्का शर्मानंही (Anushka Sharma) मीराबाई चानूचं अभिनंदन केलं आहे. अनुष्कानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट केले. त्यापैकी एका फोटो मीराबाईच्या इयरिंग्सचा आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं यामगील गोष्ट सांगणारे वृत्त शेअर केले आहे. मीराबाई चानूसाठी हे इयररिंग्स खूप खास आहेत. तिला हे तिच्या आईनं भेट दिले आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या रियो ऑलिम्पिकपूर्वी तिच्या आईनं दागिने विकून हे इयरिंग्स मीराबाईला भेट दिले होते. हे इयर रिंग्स तिच्यासाठी सुदैवी ठरतील अशी अपेक्षा होती. मात्र रियोमध्ये मीराबाईला पदक मिळवण्यात अपयश आले. त्यानंतर पाच वर्ष कठोर मेहनत आणि आईच्या आशिर्वादाच्या जोरावर मीरााबाईनं टोकयो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल पटकाले आहे.

News18

सिल्व्हर गर्ल मीराबाई चानूच्या घरी कसं होतं वातावरण? पाहा इमोशनल VIDEO वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील भारताचं हे दुसरं ऑलिम्पिक मेडल आहे. यापूर्वी करनाम मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिम्पिकमध्ये (2000) ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. मीराबाईनं यंदा सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. तिने स्नॅच गटात 87 तर क्लीन एंड जर्क गटात 115 असे एकूण 202 किलो वजन उचलले. चीनची वेटलिफ्टर हाऊ झिहूनं एकूण 210 किलो वजन उचलत गोल्ड मेडल पटकावलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात