मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics 2020: भारताचे आणखी एक मेडल नक्की! बॉक्सिंगमध्ये लवलीनाची सेमी फायनलमध्ये धडक

Tokyo Olympics 2020: भारताचे आणखी एक मेडल नक्की! बॉक्सिंगमध्ये लवलीनाची सेमी फायनलमध्ये धडक

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताचे एक मेडल नक्की झाले आहे. भारताची  बॉक्सर  लवलीना बोरगहेन (Lovlina Borgohain) 69 किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग स्पर्धेच्या सेमी फायमलमध्ये प्रवेश केला आहे.

टोकयो, 30 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताचे एक मेडल नक्की झाले आहे. भारताची  बॉक्सर  लवलीना बोरगहेन (Lovlina Borgohain) 69 किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग स्पर्धेच्या सेमी फायमलमध्ये प्रवेश केला आहे.  लवलीनानं चीनच्या निएन चिन चेनचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. बॉक्सिंगमध्ये ब्रॉन्झ मेडलसाठी मॅच होत नाही. त्यामुळे सेमी फायनलमधील मॅचचा निकाल काहीही लागला तरी लवलीनाचं मेडल नक्की झाले आहे. यापूर्वी लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोमनं ब्रॉन्झ मेडल पटकावले होते. त्यानंतर ऑलिम्पिक मेडल जिंकणारी लवलीना ही दुसरी बॉक्सर ठरली आहे.

लवलीना या मॅचमधील तीन्ही राऊंडमध्ये जोरदार खेळ करत निएन चेनला कोणतीही संधी दिली नाही. लवलीना ही आसाममधील पहिलीच महिला बॉक्सर आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या लवलीनाकडून यंदा पदकाची मोठी अपेक्षा होती. तिनं या अपेक्षा पूर्ण करत मेडल निश्चित केले आहे.

आणखी 2 बॉक्सर शर्यतीत

भारताच्या सतीश कुमारने जमैकाच्या रिकार्डो ब्राऊनला नमवत क्वार्टर फायनलमध्ये (Satish Kumar Olympics) प्रवेश केला आहे. 91 किलो वजनगटातील बॉक्सिंगमध्ये 4-1 अशा मोठ्या फरकाने सतीशने हा सामना खिशात घातला. पहिला राऊंड 5-0 ने जिंकल्यानंतर, सतीशने दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 4-1 ने विजय मिळवला. आता क्वार्टर फायनलमध्ये पोहोचल्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी सतीशला केवळ एक टप्पा ओलांडायचा (Satish Kumar in Quarter Finals) आहे. भारताची आणखी एक बॉक्सर पूजा राणी देखील पदकापासून फक्त एक विजय दूर आहे.

First published:

Tags: Olympics 2021