मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Tokyo Olympics 2020: 121 वर्षांचा दुष्काळ संपला, नीरजच्या गोल्डन कामगिरीमध्ये Youtube चा असाही वाटा

Tokyo Olympics 2020: 121 वर्षांचा दुष्काळ संपला, नीरजच्या गोल्डन कामगिरीमध्ये Youtube चा असाही वाटा

भालाफेक (Javelin Throw) या क्रीडाप्रकारात भारताला पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळालं आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) भारताच्या नीरजने गोल्ड मेडल पटकावलं आहे.

भालाफेक (Javelin Throw) या क्रीडाप्रकारात भारताला पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळालं आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) भारताच्या नीरजने गोल्ड मेडल पटकावलं आहे.

भालाफेक (Javelin Throw) या क्रीडाप्रकारात भारताला पहिलंवहिलं सुवर्ण पदक मिळालं आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic 2020) भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये (Men's javelin throw) भारताच्या नीरजने गोल्ड मेडल पटकावलं आहे.

नवी दिल्ली, 07 ऑगस्ट: आजच्या दिवसासाठी प्रत्येक भारतीय वाट पाहत होता, आजच्या दिवसाकडे प्रत्येक क्रिडाप्रेमी डोळे लावून बसला होता. अखेर नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ने सर्वांचं 'सोनेरी स्वप्न' पूर्ण केलं. भालाफेकमध्ये नीरजने गोल्ड जिंकत देशाचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. नीजर चोप्रा भारताचा पहिला अॅथलीट आहे, ज्याने अॅथेलेटिक्समध्ये पहिल्यांदा मेडल मिळवून दिलं आहे, ते देखील थेट गोल्डन कामगिरी करत. मात्र हे गोल्ड जिंकणं सोपं नव्हतं, त्यामगे अनेक वर्षांची मेहनत आहे, जिद्द आहे, गरिबीचे चटके आहेत. हे सर्व अडथळे पार करत नीरजने सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे.

नीरजच्या या कामगिरीत फिटनेसचा देखील महत्त्वाचा अडथळा होता. 10-12 वर्षांचा असताना त्याचे वजन जास्त होते. त्यावेळी वजन कमी करण्यासाठी त्याच्या वडिलांनी आणि काकांनी पानिपतच्या शिवाजी स्टेडियममध्ये धाडले होते, त्यावेळी अनेक खेळ नीरजने खेळले. त्यावेळी वजनामुळे धावणे, लांबउडी, उंचउडी हे त्याच्यासाठी कठीण होते. एकदा स्टेडियममध्ये फिरत असताना काही वरिष्ठ खेळाडूंना त्याने भालाफेक करताना पाहिलं. गमतीतच त्याने भाला फेकला आणि पूर्ण ताकदीने थ्रो केला. नीरजचा थ्रो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. त्या घटनेनंतर या खेळातील चुणूक जाणवल्याने त्यासाठी मेहनत घेण्यास सुरुवात केली. दररोज 7-8 तासांची मेहनत करण्यास नीरजने सुरुवात केली.

गरीब शेतकरी कुटुंबातील 'नीरज'ने उंचावली भारताची मान

सामान्य कुटुंबातील या मुलानं आज भारताचं नाव मोठं केलं आहे, पण ही लढाई सोपी नव्हती. गरिबी तर मोठी समस्या होती. नीरजचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. तो एका संयुक्त कुटुंबात राहत होता, ज्यामध्ये एकूण 17 सदस्य होते. कुटुंबात गरिबी एवढी होती की, त्याच्या या क्रिडाप्रकारासाठी 7000  रुपयांचा भाला देखील मोठ्या मुश्किलीने खरेदी करण्यात आला होता. त्यावेळी भालाफेकसाठी वापरण्यात येणाऱ्या भाल्याची किंमत दीड लाखांचा आसपास होती. त्याच्या हातात भाला जरी स्वस्तातला होता असला तरी, जिद्द मोठी होती. त्याचं स्वप्न सोन्यासारखं होतं- जे की आज पूर्ण झालं आहे.

YouTube ला बनवलं कोच

नीरज चोप्राने असेही दिवस पाहिले आहेत की त्याच्याकडे कोणताही कोच नव्हता, मात्र त्याने हार मानली नाही. लहानपणापासूनच त्याने चिकाटी बाळगली होती. सुरुवातीच्या काही काळात त्याने You Tube वरुन भालाफेकचं ट्रेनिंग घेतलं होतं. तो काही व्हिडीओ पाहत असे, आणि त्या व्हिडीओनुसार मैदानात भाला फेकण्याचा प्रयत्न करत असे. त्यानंतर पाहता पाहता तो यमुनानगरमध्ये ट्रेनिंगसाठी जाऊ लागला आणि त्याच्या करिअरला पंख मिळाले

First published:
top videos

    Tags: Olympic, Olympics 2021