मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /.... तर मीराबाईला मिळू शकतं Gold! चीनच्या विजेतीची होतेय डोपिंग टेस्ट

.... तर मीराबाईला मिळू शकतं Gold! चीनच्या विजेतीची होतेय डोपिंग टेस्ट

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचणाऱ्या मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याचीही शक्यता आहे.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचणाऱ्या मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याचीही शक्यता आहे.

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचणाऱ्या मीराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याचीही शक्यता आहे.

    टोकियो, 26 जुलै: Tokyo 2020 ऑलिम्पिकमध्ये (Olympics 2021) भारताला पहिलं रौप्य पदक मिळवून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu can get gold) हिला कदाचित सुवर्णपदकही (gold medal to Mirabai) मिळू शकतं. वेटलिफ्टिंगमध्ये (Weight lifting) तिच्या गटात सर्वोच्च गुण मिळवून सुवर्णपदक मिळवणाऱ्या चीनच्या होऊ झिहुई (Hou Zhihui) हिची Anti-doping authorities कडून चाचणी होणार आहे. या चाचणीत झिहुई हिने उत्तेजक घेतल्याचं आढळलं तर दुसऱ्या क्रमांकावरच्या मीराबाई चानूला (Mirabai Chanu) सुवर्णपदक बहाल केलं जाईल.

    वेटलिफ्टर मीराबाई चानूनं (Mirabai Chanu) टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सिल्व्हर मेडल जिंकत इतिहास रचला आहे. वेटलिफ्टिंगच्या 49 किलो वजनी गटात सहभागी झालेल्या मीराबाईकडून यंदा संपूर्ण देशाला मोठी अपेक्षा होती. मीराबाईनं 202 किलो वजन उचलत ही अपेक्षा पूर्ण केली. भारताला वेटलिफ्टिंगमध्ये 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच मेडल मिळालं आहे.

    Tokyo Olympics: शूटर Manu Bhaker ठरली दुर्दैवी, ऐनवेळी दगा झाल्यानं हुकलं medal

    भारताच्या स्टार वेटलिफ्टरनं हे मेडल संपूर्ण देशाला समर्पित केले आहे. 'हे एक स्वप्न होते, जे खरे झाले आहे,'अशी भावना मीराबाईनं व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तिनं परिवार, कोच आणि फॅन्सचे देखील आभार मानले आहेत. मीराबाईनं तिच्या आजवरच्या करिअरमधील सर्वोच्च कामगिरीनंतर ट्विट करत आपली भावना व्यक्त केली आहे.

    वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील भारताचं हे दुसरं ऑलिम्पिक मेडल आहे. यापूर्वी करनाम मल्लेश्वरीनं सिडनी ऑलिम्पिकमध्ये (2000) ब्रॉन्झ मेडल जिंकले होते. मीराबाईनं यंदा सिल्व्हर मेडलला गवसणी घातली आहे. तिने स्नॅच गटात 87 तर क्लीन एंड जर्क गटात 115 असे एकूण 202 किलो वजन उचलले. चीनची वेटलिफ्टर हाऊ झिहूनं एकूण 210 किलो वजन उचलत गोल्ड मेडल पटकावलं.

    First published:

    Tags: Olympic, Olympics 2021, Tokyo, Weight lifting