• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympics: शूटर Manu Bhaker ठरली दुर्दैवी, ऐनवेळी दगा झाल्यानं हुकलं medal

Tokyo Olympics: शूटर Manu Bhaker ठरली दुर्दैवी, ऐनवेळी दगा झाल्यानं हुकलं medal

टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) रविवारी भारताची सुरुवात खराब झाली. 19 वर्षांची तरुण शूटर मनू भाकरकडून (Manu Bhakar) यंदा देशाला पदकाची मोठी अपेक्षा होती. मात्र ती दुर्दैवी ठरली.

 • Share this:
  टोकयो, 25 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये  (Tokyo Olympics 2020) रविवारी भारताची सुरुवात खराब झाली. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये (Women’s 10m Air Pistol) भारताच्या दोन शूटर मनू भाकर (Manu Bhaker) आणि यशस्विनी देसवाल (Yashaswini Deswal) या दोघीही अपयशी ठरल्या. पात्रता फेरीतून फायनलमध्ये जाण्यासाठी त्यांना टॉप आठमध्ये प्रवेश करणे आवश्यक होते. मात्र यामध्ये त्यांना अपयश आले. मनू ठरली दुर्दैवी  19 वर्षांची तरुण शूटर मनू भाकरकडून यंदा देशाला पदकाची मोठी अपेक्षा होती. तिने या स्पर्धेत सुरुवात देखील चांगली केली. पहिल्या सीरिजनंतर ती तिसऱ्या क्रमांकावर होती. मात्र त्यानंतर दुर्दैव तिच्या आडवे आले. तिचे पिस्तूल स्पर्धेच्या दरम्यान खराब झाले. पिस्तूल खराब झाल्यानं तिचे पाच मिनिटं वाया गेले. पाच मिनिटाच्या अडथळ्यानंतर ती स्पर्धेत परतली. मनूनं त्यानंतर प्रयत्नांची शर्थ केली. मात्र वेळेचा दबाव तिच्यावर भारी पडला. फ्रान्स आणि यूक्रेनच्या शूटर्सबरोबर तिचा शूट ऑफ सामना रंगला. त्यामध्ये ती बाहेर पडली मनूला पिस्तूलनं साथ दिली असती तर राऊंडचं चित्रं वेगळं दिसलं असतं. भारताची दुसरी शूटर यशस्विनी देसवालला देखील फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले. तिला 574 पॉईंट्सह 13 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रिओ ऑलिम्पिकमधील अपयशानंतर भारताला शूटिंगमध्ये यंदा मोठी अपेक्षा आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शूटर्स अपयशी ठरले. पीव्ही सिंधूची विजयी सलामी, रोईंग टीमची सेमी फायनलमध्ये धडक शनिवारी इलोवेनिल वालारिन आणि अपूर्वी चंदेला ही जोडी 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरली. इलावेनिल 626.5 पॉईंट्ससह 16 व्या तर चंदेला 621.9 पॉईंट्ससह 36 व्या क्रमांकावर होती. सौरभ चौधरीनं  पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलमध्ये तो सहाव्या क्रमांकावर राहिला.
  Published by:News18 Desk
  First published: