नवी दिल्ली, 13 एप्रिल: सलग चार पराभवानंतर शेवटच्या क्रमांकावर फेकलेल्या गेलेल्या चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या सीझनमध्ये अखेर खाते उलगडले. त्यामुळे संघात उत्साहाचे वातावरण आहे. अशातच माजी फिरकीपटू हरभजन सिंहने (Harbhajan Singh ) माजी कर्णधार एम एस धोनीसंदर्भात वक्तव्य करत तीव्र नाराजी (Toh baaki 10 waha lassi peene gaye the?’ – Harbhajan Singh on MS Dhoni getting credit for India’s World Cup 2011 triumph)व्यक्त केली आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात भारताचा माजी फिरकीपटू हरभजनसिंह एनालिस्टच्या भूमिकेत दिसत आहे. याचदरम्यान, हजभजन सिंहनं आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2011 संदर्भात मोठं वक्यव्य केलं आहे. हरभजननं 2011 चं विश्वचषक जिंकण्याचं श्रेय धोनीला दिले जात असल्यावरून टीका केली. स्टार स्पोर्टवर चर्चा करताना भज्जीने संताप व्यक्त केला. जेव्हा ऑस्ट्रेलिया विश्वचषक जिंकतो तेव्हा हेडिंग असं की ऑस्ट्रेलियन संघानं विश्वचषक जिंकला. जेव्हा भारतानं विश्वचषक जिंकला, तेव्हा हेडिंग आले की महेंद्रसिंह धोनीनं विश्वचषक जिंकला, मग इतर खेळाडू लस्सी प्यायला गेले होते का? बाकीच्या 10 जणांनी काय केलं? गौतम गंभीरने काय केलं? असे सवाल उपस्थित करत हा खेळ संघावर अवलंबून असतो. संघात अकरा खेळाडू खेळत आहेत. त्यापैकी सात-आठ खेळाडू चांगलं खेळल्यानंतर तुमचा संघ पुढे जातो. असे त्याने यावेळी म्हटले आहे. ‘RCB जिंकत नाही, तोपर्यंत लग्नच करणार नाही’ तरुणीसह पोस्टर व्हायरल भारताने 2011 च्या विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळला. ज्यामध्ये धोनीने नाबाद 91 धावांची खेळी केली होती. ज्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. धोनीने षटकार मारून भारतीय संघाला विश्वचषक विजेता बनवलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.