मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /David Warner चा सनरायझर्स हैदराबादला गंभीर इशारा, लवकरच करणार अलविदा

David Warner चा सनरायझर्स हैदराबादला गंभीर इशारा, लवकरच करणार अलविदा

David Warner

David Warner

हैदराबादच्या माजी कर्णधारा डेव्हिड वॉर्नरने (David Warner) आपण या फ्रँचायझीपासून वेगळे होत असल्याचे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: आयपीएल 2022 (IPL 2022 Retention) साठी आजचा दिवस मोठा आहे. टी-20 लीगचे 8 जुने संघ कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करतील. दरम्यान, क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरचे (David Warner) अनेक चाहते आहेत. त्यातीलच एका चाहत्याने त्याच्या आयपीएलच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाला स्वतः डेव्हिड वॉर्नरने उत्तर दिले आहे.

हैदराबादच्या माजी कर्णधाराने आपण या फ्रँचायझीपासून वेगळे होत असल्याचे संकेत दिले आहेत. इन्स्टाग्रामवर एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने याची पुष्टी केली आहे.

एका चाहत्याने डेव्हिड वॉर्नरला इंस्टाग्रामवर जर फ्रँचायझीने तुम्हाला आयपीएल 2022 साठी कायम ठेवलं तर तू सनरायझर्स हैदराबादसाठी खेळशील का? असा सवाल उपस्थित केला.

यावर वॉर्नर म्हणाला - फ्रँचायझी असे करणार नाही. पण मी याबाबत काहीही करू शकत नाही. असे उत्तर दिले.

वॉर्नरच्या नेतृत्वाखाली SRH आयपीएलचे विजेतेपद पटकावले

वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनराईजर्स हैदराबादने २०१६ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, 2020 मध्ये, वॉर्नरच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने तिसरे स्थान मिळविले. पण आयपीएल 2021 मध्ये त्याची कामगिरी चांगली झाली नाही. या कारणामुळे त्याला आधी कर्णधारपद आणि नंतर प्लेइंग-11 मधून बाहेर व्हावे लागले. त्याने 8 सामन्यात 195 धावा केल्या. आयपीएल 2021 च्या UAE लेगच्या काही सामन्यांमध्ये डावखुरा फलंदाज प्लेइंग-11 चा भाग बनला होता. मात्र त्या सामन्यांमध्येही त्याला धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर त्याला वगळण्यात आले.

T20 वर्ल्ड कपमध्ये वॉर्नरची बॅट चांगलीच तळपली

या डावखुऱ्या फलंदाजाने T20 विश्वचषकात शानदार पुनरागमन केले आणि 7 सामन्यात 289 धावा केल्या. या कामगिरीच्या आधारे त्याला आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मोठ्या किमतीत विकत घेतले जाऊ शकते. एवढेच नाही तर त्याला कर्णधारपदही मिळू शकते. कारण पुढच्या मोसमात अहमदाबाद आणि लखनौ हे २ नवे संघ लीगमध्ये जोडले जातील. अशा परिस्थितीत, हैदराबादच्या वॉर्नरला सोडल्यास, ही फ्रेंचायझी त्याच्यावर पैज लावू शकते.

First published:

Tags: David warner, IPL 2021, Ipl 2021 auction, Ipl 2022, Ipl 2022 auction