दुबई, 1नोव्हेंबर: टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील टीम इंडियाची (Team India) सध्याची कामगिरी पाहता सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमनेदेखील (Wasim Akram) टीम इंडियाच्या कामगिरीवर भाष्य करत वर्ल्ड कपपूर्वी खेळवण्यात आलेल्या आयपीएलवर (IPL2021) बोट ठेवले आहे.
T20 वर्ल्ड कप पूर्वी , टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी या वर्षी मार्चमध्ये घरच्या मैदानावर (IND vs ENG) इंग्लंडविरुद्ध शेवटची मोठी ODI आणि T20 मालिका खेळली होती. पण त्यानंतर एकही मालिका खेळली नाही. मात्र, भारतीय खेळाडूंनी आयपीएलमध्ये नक्कीच भाग घेतला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पातळीशी लीग क्रिकेट कधीच जुळवू शकले नाहीत.
तसेच, भारतीय संघ आयपीएलला खूप जास्त महत्त्व देत आहेत आणि त्यांना वाटतं की आयपीएल आपल्यासाठी पुरेसं आहे असे वाटते. लीग क्रिकेट खेळताना तुम्हाला काही चांगले गोलंदाज भेटतील. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला विरोधी पक्षातील पाच महान गोलंदाजांचा सामना करावा लागतो. असे मतही अक्रमने यावेळी व्यक्त केले.
यासोबतच अक्रमने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियानं बदलेल्या रणनितीवरही भाष्य केले. नाणेफेक गमावल्यानंतरच टीम इंडिया खचली असल्याचे पाहायला मिळाले. संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय योग्यच केला कारण या क्रमांकावर रोहितने 4 शतके झळकावली आहेत. भारतीय संघाला हवे असते तर इशान किशनला नंबर-3 वर खेळायला पाठवता आले असते. असे मत अक्रमने यावेळी व्यक्त केले.
भारतीय संघाला पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांकडून हार पत्करावी लागली. या सामन्यांच्या दरम्यान भारतीय संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीही अगदी सामान्यच होती. भारतीय संघ या दोन्ही सामन्यांच्या दरम्यान फारशी आकर्षक खेळी करु शकला नाही.
टी 20 विश्वचषकाच्या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाचा आठ विकेट्सने पराभव केला. टी-20 विश्वचषकातील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. भारताचा उपांत्य फेरी गाठण्याचा मार्ग आता खूपच कठीण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, IPL 2021, T20 league, T20 world cup, Team india