मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /या भारतीयासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी केलंय धर्मांतर, या खेळाडूने तर प्रेमासाठी बदलला धर्म

या भारतीयासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी केलंय धर्मांतर, या खेळाडूने तर प्रेमासाठी बदलला धर्म

जगभरातील क्रिकेट संघांतील खेळाडू आहेत ज्यांनी आपला धर्म बदलला आहे. यामध्ये एका भारतीय क्रिकेटपटूचाही (Indian Cricketer) समावेश आहे.

जगभरातील क्रिकेट संघांतील खेळाडू आहेत ज्यांनी आपला धर्म बदलला आहे. यामध्ये एका भारतीय क्रिकेटपटूचाही (Indian Cricketer) समावेश आहे.

जगभरातील क्रिकेट संघांतील खेळाडू आहेत ज्यांनी आपला धर्म बदलला आहे. यामध्ये एका भारतीय क्रिकेटपटूचाही (Indian Cricketer) समावेश आहे.

    नवी दिल्ली, 21 जुलै: कुठल्याही खेळाडूसाठी त्याच्या देशाकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळायला मिळावं, देशाचं प्रतिनिधित्व (Representation of Country) करायला मिळावं ही सर्वांत महत्त्वाची इच्छा असते. पण काही जणांना त्यांच्या देशाच्या राष्ट्रीय संघातून (National Team) किंवा देशाकडून खेळण्याची संधी मिळत नाही. पण त्यांचं खेळावरचं प्रेम अबाधित असतं. त्यामुळे ते दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतात आणि त्या देशाच्या राष्ट्रीय संघातून खेळतात किंवा त्या देशाकडून खेळतात. हे झालं देश बदलून खेळण्याचं. आताच्या इंग्लंडच्या क्रिकेट टीममध्ये (England Cricket Team) बरेच खेळाडू इतर देशांतील आहेत. क्रिकेटमध्ये असं होत आलं आहे.

    जसा खेळाडूंनी देश बदलला तसंच काही खेळाडूंनी त्यांचा धर्मही बदलला आहे. जगभरातील क्रिकेट संघांतील खेळाडू आहेत ज्यांनी आपला धर्म (Cricketers who changed their Religion) बदलला आहे. प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. कुणी इस्लाम धर्म सोडून बौद्ध धर्मात (Buddhism) प्रवेश केला आहे, तर कुणी ख्रिश्चन धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. यामध्ये एका भारतीय क्रिकेटपटूचाही (Indian Cricketer) समावेश आहे.

    दिलशान तिलकरत्ने -

    श्रीलंकेचा महान बॅट्समन दिलशान तिलकरत्ने (Sri Lankan Batsman Dilshan Tillakaratne) जगभर नावाजलेला क्रिकेटपटू आहे. त्यानी धर्म बदलला आहे. दिलशानचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला होता. पण जेव्हा तो 16 वर्षांचा झाला, तेव्हा इस्लाम धर्म (Islam) सोडून बौद्ध धर्म (Buddhism) स्वीकारला. धर्म बदलण्यासाठी दिलशान त्याच्या कुटुंबापासून वेगळा झाला होता. त्यानंतर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. तिलकरत्नेनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम बॅटिंग करून आपलं नाव क्रिकेटविश्वात दखलपात्र बनवलं.

    IND vs SL : टीम इंडियाने इतिहास घडवला, पाकिस्तानला मागे टाकत केला वर्ल्ड रेकॉर्ड

    सूरज रणदीव -

    श्रीलंकेचाच आणखी एक खेळाडू सूरज रणदीव यानेही धर्मपरिवर्तन केलं होतं. सूरज रणदीव हा श्रीलंकेचा स्पिन बॉलर (Sri Lankan Spinner Suraj Randiv) होता आणि आयसीसी वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट 2011 च्या फायनल (ICC Cricket World Cup) सामन्यात तो भारताविरुद्ध खेळला होता. सूरजचा जन्म मूळ मुस्लिम कुटुंबात झाला होता. त्याने नंतर धर्म बदलला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. त्याने त्याचं नावही बदललं होतं.

    युसूफ योहाना -

    पाकिस्तानातील क्रिकेटर्सनी देखील धर्मपरिवर्तन केलं आहे. पाकिस्तानी बॅट्समन युसूफ योहाना (Pakistani Batsman Yusuf Yohana) याचा जन्म मूळ ख्रिश्चन (Christianity) कुटुंबात झाला होता. पण नंतर तो सातत्याने तब्लिगी जमातमध्ये सक्रिय झाला आणि अखेर त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. युसूफने आपलं नावही बदललं होतं. त्याने आपलं नाव मोहम्मद युसूफ केलं होतं. 2005 मध्ये त्याने आपण इस्लाम धर्म स्वीकारल्याचं जगजाहीर केलं होतं.

    (वाचा - कॉमेंट्री करताना 'ब्राह्मण' कार्ड, सुरेश रैना सोशल मीडियावर ट्रोल)

    वेन पार्नेल -

    दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर वेन पार्नेलनेही (South African Pace Bowler Wayne Parnell) धर्म परिवर्तन केलं होतं. त्याने ख्रिश्चन धर्म (Christianity) सोडून इस्लाम धर्म (Islam) स्वीकारला होता. याबाबत अशी माहिती होती, की दक्षिण आफ्रिकेच्या टीममधील सीनिअर खेळाडू आणि बॅट्समन हाशीम अमला (Hasim Amla) याच्या वागण्यामुळे प्रभावित होऊन वेननी आपला धर्म बदलला. वेनने 2011 मध्ये इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता.

    एजी कृपाल सिंह -

    भारताचे माजी क्रिकेटपटू एजी कृपाल सिंह (Indian Cricketer Ag Kripal Singh) यांनीही धर्मपरिवर्तन केलं होतं. त्यांचा जन्म मूळ शीख कुटुंबात (Sikh) झाला होता. पण त्यांनी लग्न करण्यासाठी धर्म बदलला होता. कृपाल सिंह यांनी ख्रिश्चन धर्म (Christianity) स्वीकारला होता. धर्म बदलल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून अरनॉल्ड जॉर्ज असं ठेवलं होतं.

    First published:
    top videos

      Tags: Cricket, India, International, Muslim, Religion, Sports, World cricket