जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / कॉमेंट्री करताना 'ब्राह्मण' कार्ड, सुरेश रैना सोशल मीडियावर ट्रोल

कॉमेंट्री करताना 'ब्राह्मण' कार्ड, सुरेश रैना सोशल मीडियावर ट्रोल

कॉमेंट्री करताना 'ब्राह्मण' कार्ड, सुरेश रैना सोशल मीडियावर ट्रोल

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. ब्राह्मण (Brahmin) असल्यामुळे आपल्याला चेन्नईची संस्कृती स्वीकारणं सोपं गेल्याचं रैना म्हणाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चेन्नई, 20 जुलै : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना (Suresh Raina) याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. ब्राह्मण (Brahmin) असल्यामुळे आपल्याला चेन्नईची संस्कृती स्वीकारणं सोपं गेल्याचं रैना म्हणाला आहे. तामीळनाडू प्रीमियर लीग म्हणजेच टीएनपीएलच्या (TNPL) कॉमेंट्रीसाठी सुरेश रैनाला बोलावण्यात आलं होतं. टीएनपीएलची पहिली मॅच सोमवारी लायका कोवाई किंग्स आणि सालेम स्पार्टन्स यांच्यात झाली. या मॅचदरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) खेळाडू असलेल्या रैनाला कॉमेंटेटरने दाक्षिणात्य संस्कृतीजवळ जाणं कसं शक्य झालं, असा प्रश्न विचारला.

जाहिरात

कॉमेंटेटरच्या प्रश्नाचं उत्तर देताना रैना म्हणाला, ‘माझ्या मते मीही ब्राह्मण आहे. 2004 पासून मी चेन्नईमध्ये खेळत आहे. मला इथल्या संस्कृतीबद्दल प्रेम आहे. तसंच मला टीममधले सहकारीही आवडतात. मी अनिरुद्ध श्रीकांत, सुब्रमण्यम बद्रीनाथ आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्यासोबत खेळलो आहे. त्यांच्याकडून तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आमच्या टीमचं प्रशासनही चांगलं आहे. आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य आहे. चेन्नई सुपरकिंग्सच्या टीममध्ये असल्याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. आम्ही तिकडे आणखी सामने खेळू अशी अपेक्षा,’ असं वक्तव्य रैनाने केलं.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

34 वर्षांच्या सुरेश रैनाने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने आपण संन्यास घेत असल्याची घोषणा केल्यानंतर रैनाने पुढच्या काही मिनिटांमध्येच आपणही निवृत्त होत असल्याचं सांगितलं. आता सुरेश रैना आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना पुन्हा दिसेल. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या उरलेल्या 31 मॅच होणार आहे. 4 मे रोजी कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्थगित करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात