मुंबई, 09 जानेवारी : आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान होणार आहे. पहिल्यांदाच भारत या स्पर्धेचं आयोजन एकट्याने करणार आहे. वर्ल्ड कप 2023च्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने तयारी सुरू केली आहे. वेगवान गोलंदाजीची उणीव भारतीय संघाला नेहमीच भासली आहे. पण सध्या अनेक युवा वेगवान गोलंदाज संघात आल्याने त्यांच्यात स्पर्धा वाढली आहे. भारतीय संघात वेगवान गोलंदाजीची धुरा असलेल्या जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना तीन युवा खेळाडूंकडून आव्हान मिळू शकते. भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आयपीएलमध्येच आपल्या वेगाने चकीत केलं होतं. त्यानंतर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली तेव्हा त्याने आपला ठसा उमटवला. त्याच्या गोलंदाजीत आणि कामगिरीत सातत्य राहिल्यास तो वर्ल्ड कपमध्ये बुमराह किंवा इतर अनुभवी वेगवान गोलंदाजांची जागा घेऊ शकतो. हेही वाचा : पुण्याच्या पठ्ठ्याने मारली हिंदकेसरी; महाराष्ट्र केसरीनंतर अभिजित कटकेचा नवा पराक्रम बुमराह दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर आहे. याचा बुमराहच्या कामगिरीवर परिणाम दिसून आला. टीम इंडियात पुनरागमन केल्यानतंर बुमराह महागडा ठरला होता. त्यामुळे यावेळी पुन्हा मैदानात उतरल्यानतंर त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीलासुद्धा युवा खेळाडूंचे आव्हान मिळू शकते. कसोटीत आपली जागा पक्की केलेला मोहम्मद शमी एकदिवसीय क्रिकेटमध्येही आपल्या वेगाने फलंदाजांना धडकी भरवत आहे. शमी सध्या 32 वर्षांचा असून त्याच्या जागी जर मोहम्मद सिराजला वर्ल्ड कप संघात संधी मिळाली तर त्यात आश्चर्य वाटू नये.
हेही वाचा : IND VS SL : टी २० नंतर आता वन-डे मालिकेतही जलवा दाखवण्यास टीम इंडिया सज्ज; पहा सामन्यांचे वेळापत्रक
भुवनेश्वरच्या गोलंदाजीची धारही आत कमी झाल्याचं म्हटलं जातंय. तर युवा गोलंदाज अर्शदीपने काही सामन्यात भारतीय संघातलं आपलं स्थानही भक्कम केलं आहे. चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची कला अर्शदीपला इतर गोलंदाजांपेक्षा वेगळं ठऱवते. सुरुवातीच्या षटकात विकेट घेण्यात अर्शदीप सिंहचा हातखंडा आहे. यामुळेच अर्शदीपकडे भारतीय गोलंदाजीचे भविष्य म्हणून पाहिलं जात आहे.

)







