हैदराबाद, 8 जानेवारी : तेलंगणा राज्यात सुरू असलेल्या हिंद केसरी किताबाच्या अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोनूवीर याचा 5-0 गुणांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर अभिजित कटकेने यापूर्वी 2017 मध्ये महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. अभिजीत कटके ठरला 2022 चा हिंदकेसरी पुण्यातील कुस्तीपटू अभिजीत कटके याने मानाचा हिंदकेसरी किताब पटकावला आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघाने 5 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय (51 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -2023) आयोजित केली होती. या स्पर्धेत अंतिम सामन्यात हरियाणाच्या सोनूवीर विरुद्ध अभिजीत कटके यांचा सामना झाला. यामध्ये कटके याने 5 - 0 ने सोमविर याचा पराभव करून हिंद केसरी किताब पटकावला आहे. दोघांच्या लढतीनंतर तेलंगणामध्ये सुरू असलेल्या हिंद केसरीची गदा महाराष्ट्राकडेस जाते की हरियाणाकडे यासाठी सर्वजण उत्सुक होते. या स्पर्धेमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला. त्यामुळे सर्वांची नजर अभिजीतवर होती. वाचा - सूर्यकुमारकडून काढून घेण्यात आले होते कर्णधारपद; टीम मधूनही दाखवला होता बाहेरचा 2017 मध्ये महाराष्ट्र केसरी 2017 भूगावमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीतने किरण भगतला पराभूत करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला होता. अभिजीत दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी आहे. दरम्यान, अखिल भारतीय ॲमॅच्युअर रेसलिंग फेडरेशनतर्फे हिंदकेसरी हा किताब देण्यात येतो. हा किताब या फेडरेशन तर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद मिळवणाऱ्या विजेत्यास दिल्या जातो. याआधी 2013 साली पुण्याचा अमोल बराटेने हा किताब पटकावला होता.
अभिजीत शिवरामदादा तालमीचा पैलवान अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे. अभिजीतचं वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे. अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो. त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचं दिसून येत आहे. 2017 साली झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटके यांनी स्पर्धा जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताबही जिंकला होता. तसेच त्यानंतर पुढच्या वर्षी त्याला उपविजेता पद मिळाल होत. आणि आत्ता त्याने हिंद केसरी हा किताब देखील पटकावला आहे.