मुंबई, 8 जानेवारी : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेनंतर आता लवकरच श्रीलंका विरुद्ध वन डे मालिकेला सुरुवात होणार आहे. शनिवारी राजकोट येथे भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेचा तिसरा सामना पारपडला. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 91 धावांनी पराभव करून मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवत मालिका विजय प्राप्त केला. सोमवार 10 जानेवारी पासून आता वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. पाच दिवसांच्या आत तीन सामने खेळवले जाणार असून सर्व सामने हे डे नाईट होणार आहेत.
श्रीलंकेविरुद्ध टी 20 मालिका लक्षात घेता वन-डे मालिकेत भारतीय संघात बरेच बदल होणार आहेत. वन-डे मालिकेत भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू संघात परतणार असून यात विराट कोहली, रोहित शर्मा तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांचा समावेश असेल. तर दुसरीकडे श्रीलंका संघात जास्त बदल होणार नाहीत. भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी यावेळी रोहित शर्मा यांच्यावर असेल.
हे ही वाचा : मुंबई इंडियन्स पलटनमध्ये 'हिटमॅन' ला 12 वर्ष पूर्ण! Video शेअर करत जागवल्या आठवणी
भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेत पहिला सामना सोमवारी 10 जानेवारी रोजी दुपारी 1:30 ला सुरु होईल. पहिला सामना गुवाहाटी येथील बालसपारा क्रिकेट स्टेडियम होणार आहे. तर दुसरा क्रिकेट सामना 12 जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डंसवर होईल. तर तिसरा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियमवर होईल.
कुठे पहाल सामना :
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारी वन-डे मालिका स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीवी चैनल्सवर पाहता येईल. तसेच याचे लाईव्ह प्रक्षेपण डिझनी+हॉटस्टार अँपवर देखील पाहता येणार आहे.
वन -डे मालिकेसाठी संघ :
भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, ईशान किशन, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.
श्रीलंका: दासुन शनाका, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, अशान बंडारा, वानिंदु हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदु फर्नांडो, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, पाथुम निसंका, प्रमोद मदुशन, कासुन राजिथा, सादीरा समरविक्रमा, महीष तीक्षणा, जेफ्री वांदरसे, दुनिथ वेलालगे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India Vs Sri lanka, Rohit sharma, Suryakumar yadav, Virat kohli