Home /News /sport /

चीअरलीडर्समुळे कोणता क्रिकेटपटू सर्वाधिक विचलित होतो? सुरेश रैनाने केला हा खुलासा

चीअरलीडर्समुळे कोणता क्रिकेटपटू सर्वाधिक विचलित होतो? सुरेश रैनाने केला हा खुलासा

यंदाच्या आयपीएल मध्ये (IPL 2020) क्रिकेट चाहते भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला (Suresh Raina) खेळताना पाहू शकले नाहीत. सध्या सोशल मीडियावर रैनाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे

    मुंबई, 19 नोव्हेंबर: यंदाच्या आयपीएल मध्ये (IPL 2020) क्रिकेट चाहते भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला (Suresh Raina) खेळताना पाहू शकले नाहीत. चेन्नईकरता (CSK) रैनाची धमाकेदार बॅटिंग सर्वांनी मिस केली. पण या काळात रैना सोशल मीडियावर सक्रीय होता. सुरेश रैना या काळात कुटुंबीयांबरोबर अधिक वेळ घालवताना दिसला. नुकताच त्याचा पत्नी प्रियांकाबरोबर टेलिव्हिजन स्क्रीन शेअर करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका यांनी हजेरी लावली होती. यामध्ये अर्चना पूरन सिंगने (Archana Puran Singh) विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना रैनाने याबाबत भाष्य केलं आहे की, चीअरलीडर्समुळे सर्वाधिक विचलित कोणता क्रिकेटपटू होतो. अर्चना पूरन सिंगने रैनाला असा प्रश्न विचारला की, चिअरलीडर्समुळे सर्वाधिक विचलित कोणता क्रिकेटपटू होतो? अत्यंत चलाखीने रैनाने हा प्रश्न हाताळला आहे. रैनाने असं उत्तर दिले की, 'चीअरलीडर्स या टीव्ही पाहणाऱ्या युजर्ससाठी असतात. आम्हा खेळाडूंचं लक्ष खेळावर केंद्रित असल्याने आम्ही त्यांना बघतच नाही. आम्ही त्यांना कधीतरी मैदानातील टीव्हीवर पाहतो, जेव्हा षटकार किंवा चौकार मारल्यावर त्या डान्स करतात'. (हे वाचा-IPL 2020: मैदानावर नाही पण याबाबतीत धोनीच्या CSK चा जलवा, RCB ला टाकलं मागे) यानंतर बोलताबोलता रैना असंही बोलून गेला की त्या चीअरलीडर 7.30 वाजता येतात. तेव्हा पुन्हा एकदा अर्चनाने रैनाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आणि म्हटलं की, तुला तर सर्व माहित आहे. रैना याबाबत सर्व स्पष्टीकरण देत असल्याचं त्याची पत्नी म्हणाली. यावर पुन्हा रैना म्हणाला की, 'स्पष्टीकरण द्यावं लागतं नाहीतर लोकांचे गैरसमज होतात.' रैनाच्या या उत्तरावर कार्यक्रमामध्ये एकच हशा पिकला. युट्यूबवर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कपिल शर्माने रैनाला काही प्रश्न विचारून भांडावून सोडल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र प्रियांका-सुरेश हा शो एन्जॉय करताना देखील दिसत आहेत. प्रियांकाला जेव्हा कपिल शर्माने विचारले की जेव्हा क्रिकेटपटूंच्या पत्नी सामना पाहण्यासाठी आलेल्या असतात, आणि त्यापैकी एखादीचा पती लवकर आऊट झाला तर ती तिथून निघून जाते का? किंवा शॉपिंग करायला जाता का? यावर प्रियांकाने असं म्हटलं की असं नाही होत कारण टीमला पाठिंबा द्यायचा असतो. मात्र त्यावेळी देखील रैनाने त्याच्या पत्नीची गंमत करताना पाहायला मिळाला.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IPL 2020, Kapil sharma, Suresh raina, The kapil sharma show

    पुढील बातम्या