मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2020 : कोरोनामुळे IPL वर टांगती तलवार, मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

IPL 2020 : कोरोनामुळे IPL वर टांगती तलवार, मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकार घेणार मोठा निर्णय

जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली.

जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली.

कोरोनामुळं भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPLला याचा फटका बसू शकतो. कोरोनामुळे IPL स्पर्धा रद्द होऊ शकते किंवा पुढे ढकलली जाऊ शकते.

  • Published by:  Priyanka Gawde

मुंबई, 10 मार्च : कोरोनामुळं सध्या साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. जवळ जवळ 80 देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. भारतातही तब्बल 50 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 5 वर पोहोचल्यानं खळबळ उडाली आहे. आता याचा फटका देशाची अर्थव्यवस्था त्याचबरोबर खेळांवरही होत आहे. त्यामुळे कोरोनामुळं भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPLला याचा फटका बसू शकतो. कोरोनामुळे IPL स्पर्धा रद्द होऊ शकते किंवा पुढे ढकलली जाऊ शकते. आता याबाबतचा निर्णय महाराष्ट्र सरकार बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत घेणार आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने कर्नाटकमध्ये आयपीएलचे सामने घेऊ नये असं सांगितलं आहे.

कोरोनामुळं राज्यात आयपीएल सामने आयोजित करायचे की नाही, याबाबत 11 मार्चला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. कोरोनामुळं आयपीएल स्पर्धा पुढे ठकलली जाऊ शकते. याआधी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री राजेश टोपे यांनी आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे सांगितले.

वाचा-IPL वेळेतच होणार पण चाहत्यांना बसणार मोठा धक्का? गांगुली घेणार महत्वाची बैठक

डियन प्रीमियर लीगचा (IPL 2020) तेरावा हंगाम 29 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगच्या सर्व 8 संघांनी जोरात त्याची तयारी सुरू केली आहे. चेन्नईमध्ये महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना या मोठ्या खेळाडूंनी सराव करण्यास सुरुवात केली आहे, तर इतर संघातील खेळाडूदेखील याची तयारी करत आहेत आणि तयारी करत आहेत. मात्र कोरोनामुळं आयपीएलवर संकट वाढले आहे. भारतातील जास्त लोकसंख्या असलेल्या भागातच आयपीएलचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. एक सामना पाहण्यासाठी जवळ जवळ 50 ते 60 हजार लोक उपस्थित असतात. अशा वेळी कोरोना विषाणूचा फैलाव होण्याचा धोका अधिक असेल.

वाचा-गांगुलीचा प्लॅन देशाला नडणार? कोरोनाची दहशत असताना पत्करला धोका

आयपीएल पुढे ढकलल्यास काय होईल?

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लीग पुढे ढकलली गेली तर ते कधी होणार असा प्रश्न आहे. कारण आयपीएल खेळण्यासाठी टीम इंडिया व अन्य खेळाडूंकडे मे नंतर वेळ नसेल. आयपीएलनंतर लगेचच भारताला आशिया चषक, विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा खेळाव्या लागतील, मग आयपीएलची तारीख कशी ठरविली जाईल? म्हणजे कोरोनामुळे आयपीएल पुढे ढकलली जाणार नाही तर सरळ रद्द होईल. आयपीएल रद्द झाल्यामुळे बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. तसेच, आठही संघांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळं सौरव गांगुली आयपीएल व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे.

First published:

Tags: Cricket