जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट

Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत BCCI ने दिली मोठी अपडेट

Rishabh Pant Accident Update: कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता बीसीसीआय़ने ऋषभ पंतच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 30 डिसेंबर : भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंतचा आज पहाटे उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला. रुर्कीजवळ झालेल्या या अपघातात ऋषभ पंत जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता बीसीसीआय़ ने त्याच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. ऋषभ पंतवर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. ऋषभ पंतला झालेल्या दुखापतीबद्दल माहिती देताना बीसीसीआयने म्हटलं की, ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी जखम झाली आहे. तसंच त्याच्या उजव्या गुडघ्याजवळ फ्रॅक्चर झाले आहे. याशिवाय उजव्या हाताच्या मनगटाला, घोट्याला आणि पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीला मार लागला आहे. हेही वाचा :  आईला सरप्राइज द्यायला एकटाच कारने निघाला होता पंत, समोर आलं अपघाताचं कारण सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर असून डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात त्याला हलवण्यात आले आहे. त्याला झालेली दुखापत किती गंभीर आहे आणि त्याच्यावर काय उपचार करायचे यासाठी आता एमआरआय स्कॅन करण्यात येणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बीसीसीआयने म्हटलं की, आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहोत. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही चर्चा करत आहोत. ऋषभला आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आणि त्याला या घटनेतून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य आम्ही देऊ असंही बीसीसीआयने म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात