The Ashes : विराट कोहली की स्टिव्ह स्मिथ कोण बेस्ट? चाहत्यांमध्ये रंगला ट्विटर वॉर!

The Ashes : विराट कोहली की स्टिव्ह स्मिथ कोण बेस्ट? चाहत्यांमध्ये रंगला ट्विटर वॉर!

The Ashes : एकाच सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकाविणारा स्मिथ हा सहावा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे.

  • Share this:

लंडन, 06 ऑगस्ट : ग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला. पहिल्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं.पहिल्या डावात 8 बाद 122 धावांवरून स्मिथनं ऑस्ट्रेलियाला 284 धावांपर्यंत मजल मारून दिली. पहिल्या डावात स्मिथनं 219 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकार खेचून 144 धावा केल्या. दुसऱ्या डावातही स्मिथची धावांची भूक कायम दिसली.

इंग्लंडच्या पहिल्या डावातील 90 धावांची आघाडीचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे तीन फलंदाज 75 धावांत तंबूत परतले होते. त्यानंतर स्मिथ आणि टॅ्व्हीस हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. त्यानंतर स्मिथनं मॅथ्यू वेड सह 126 धावांची भागीदारी केली. स्मिथनं 207 चेंडूंत 14 चौकारांच्या मदतीनं 142 धावा केल्या. स्मिथनंतर वेडनं 143 चेंडूंत 17 चौकारांच्या मदतीनं 110 धावांची खेळी केली. एवढेच नाही तर एकाच सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकाविणारा स्मिथ हा सहावा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. तर, इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा फलंदाज आहे.

आता यानंतर स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांच्यात कोणता फलंदाज सर्वोत्तम आहे, अशी चर्चा चाहत्यांमध्ये ट्विटवर रंगली. अ‍ॅशेस 2019च्या पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात स्मिथनं शतकी कामगिरी केली. त्यानंतर चाहत्यांनी या दिग्गज खेळाडूंमध्ये कोण सर्वोत्तम अशी चर्चा करण्यास सुरुवात केली.

वाचा-जगज्जेत्यांना हे वागणं शोभत नाही, जेसन रॉयने बाद झाल्यानंतर केलं असभ्य वर्तन!

वाचा-शेवटच्या सामन्यात रोहितला मिळू शकते विश्रांती, तर 'या' खेळाडूंना मिळणार संधी

स्मिथ-कोहली वॉर

स्मिथनं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात कठिण प्रसंगी संघाला गरज असताना शतकी खेळी केली. तर कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या खेळीत नेहमी सातत्य राहिले आहे. कसोटीमध्ये विराटची सरासरी 60 आहे. तर आयसीसी क्रमवारीतही विराट पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र चाहत्यांच्या नजरेत स्मिथ हा विराटपेक्षा सर्वश्रेष्ठ असल्याचे चित्र दिसत आहे.

वाचा-शाहरूखला मोठा झटका, 'या' दोन मुख्य खेळाडूंनी सोडली KKRची साथ!

VIDEO : पंतप्रधान मोदींना भारतरत्न देण्याची मागणी; यासह पाहा 4 वाजताच्या टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 08:05 AM IST

ताज्या बातम्या