बर्मिंगहम, 06 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला. पहिल्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं. दरम्यान, या सामन्याला गालबोटही लागलं आहे. सुरुवातीला इंग्लंडच्या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियाच्या स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर टीका केली. दोघांनाही चेंडू छेडछाड प्रकरणावरून डिवचण्याचा प्रयत्न केला. पहिल्या कसोटीवेळी इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेसन रॉयने बाद झाल्यानंतर असभ्य वर्तन केलं. जेसन रॉय बाद झाल्यानं नाराज होऊन ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्याकडे पाहून थुंकला. त्याच्या या कृतीनं अनेकांनी टीका केली आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जेसन रॉय आणि रॉरी बर्न्स मैदानावर टिकून राहण्याची धडपड करत होते. नाथन लॉयनने दोघांनाही बाद केलं. पहिल्यांदा बर्न्स झेलबाद झाला. त्यानंत जेसन रॉय पुढे येऊन खेळण्याच्या नादात त्रिफळाचित झाला. जेसन रॉय बाद झाल्यानंतर पॅव्हिलियनकडे जात असताना ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी त्याला चिडवत बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला. यावर जेसन रॉयनं ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांच्या दिशेने बघत थुंकला.
अॅशेस मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियानं 251 धावांनी जिंकली. बर्मिंघममधील एजबस्टनवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथनं दोन्ही डावात शतकं केली. त्यालाच सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यानं पहिल्या डावात 144 आणि दुसऱ्या डावात 142 धावा केल्या. VIDEO: काश्मीरप्रश्नी अमित शहांचा आक्रमक अंदाज म्हणाले, आम्ही बलिदानही देऊ!