विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरोधात होत असलेली तीन सामन्याची टी-20 मालिका 2-0नं आपल्या खिशात घातली.
दरम्यान आता वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्यासाठी तिसऱ्या सामन्यात संघात काही बदल करण्याचा निर्णय कर्णधार विराट कोहली घेऊ शकतो. मंगळवारी शेवटचा टी-20 सामना होणार आहे.
रोहित शर्माचे अर्धशतक आणि कृणाल पांड्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतानं दुसरा टी-20 सामना जिंकला. त्यामुळं तिसऱ्या सामन्यात नवख्या खेळाडूंना विराट संधी देऊ शकतो.
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या राहुल चहरला तिसऱ्या सामन्या संधी मिळू शकते. 2017मध्ये राहुलला आयपीएलमध्ये पुणे सुपरजायंट्स संघानं विकेत घेतले होते. मात्र एकाही सामन्यात त्याला संधी देण्यात आली नाही. त्यानंतर 2017-18मध्ये सैयद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत चांगले प्रदर्शन केल्यामुळं राहुलला मुंबई इंडियन्स संघानं तब्बल 1.9 कोटींना विकत घेतले.
राहुल चहरच्या योगदानामुळं 2019मध्ये मुंबईला चॅम्पियनपद मिळाले. मुंबई इंडियन्सकडून त्यानं 13 सामन्यात 13 विकेट घेत महत्त्वाची भूमिका बजावली. प्रत्येक सामन्यात त्यानं 7 पेक्षा कमी धावा दिल्या.
शेवटच्या सामन्यात श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळू शकते. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करू शकतो.
तसेच, केएल राहुलला रोहितच्या जागी संधी मिळू शकते. वर्ल्ड कपमध्ये पाच शतकी खेळी करणाऱ्या रोहितनं दुसऱ्या टी-20 सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. त्यामुळं त्याला विश्रांती दिली जाऊ शकते