The Ashes : इंग्लंडच्या खेळाडूंना चडली विजयाची नशा, भर मैदानातच झाली बिअर पार्टी!

रोमांचक विजयानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष साजरा करतात मात्र इंग्लंडच्या खेळाडूंनी एक भलताच प्रयोग केला.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 03:58 PM IST

The Ashes : इंग्लंडच्या खेळाडूंना चडली विजयाची नशा, भर मैदानातच झाली बिअर पार्टी!

लीड्स, 26 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात स्टार ऑलराऊंडर बेन स्टोकनं अविश्वसनिय खेळी केली. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला धक्का देत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो बेन स्टोक्स. त्याने नाबाद 135 धावांची खेळी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. दरम्यान, अशा रोमांचक विजयानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये जल्लोष साजरा करतात मात्र इंग्लंडच्या खेळाडूंनी एक भलताच प्रयोग केला.

तिसऱ्या कसोटी सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगज्जेत्या इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावांवर बाद होण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावत इंग्लंडनं ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1- 1 अशी बरोबरी केली आहे. दरम्यान या सामन्यानंतर स्टोक्सनं आपल्या डायटच्या खुलासा केला आणि या विजया मागचे खरे कारण सांगितले. इंग्लंडनं 359 धावांचा पाठलाग करताना, 286 धावांवर नऊ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्टोक्स 61 धावांवर खेळत होता. त्यानंतर बेननं चक्क 135 धावांची अनपेक्षित खेळी केली. त्याच्या सोबत जॅक लीचनं केवळ 1 धावा काढत 76 धावांची नाबाद खेळी केली.

अॅशेस मालिकेतील विजयानंतर इंग्लंडच्या खेळाडूंना हेडिंग्ले मैदानात बिअर पीत आपला जल्लोष साजरा केला. इंग्लंडच्या खेळाडूंची ही बिअर पार्टी सुरू असताना दर्शक उपस्थित नव्हते. मात्र सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत. इंग्लंडच्या एक समालोचकानं हे फोटो अपलोड केले होते. दरम्यान चाहत्यांनी यावर खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करताना काळजी घ्यावी असे ट्वीट केले आहेत.

वाचा-इंग्लंडच्या विजयाचं धक्कादायक कारण, चॉकलेट-चिकनमुळे झाला ऑस्ट्रेलियाचा पराभव?

2013मध्ये घडला होता दयनीय प्रकार

2013मध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलिया विरोधात अॅशेस मालिकेतील विजयानंतर इंग्लंडच्या तीन खेळाडूंनी मैदानावरच लघुशंका केली होती. स्टुअर्ट ब्रॉड, केविन पीटरसन आणि जेम्स अॅडरसन यांसारखे दिग्गज खेळाडू यात अडकले होते. दरम्यान, या सारख्या प्रकारामुळं इंग्लंडच्या खेळाडूंनी सर्वांसमोर माफी मागितली होती. मात्र, यावेळी विजयानंतर असा काही प्रकार घडला नाही.

135 वर्षांनंतर इंग्लंडन केली अजब कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला पहिल्या डावात 67 धावा करता आला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावातही साजेशी सुरुवात करता आली नाही. पण, मार्नस लॅबुशचॅग्ने ( 80) याच्या चिवट खेळीच्या जोरावर त्यांनी 246 धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर विजयासाठी 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र बेन स्टोकनं ऑस्ट्रेलियाच्या आशा धुळीस मिळवल्या. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव 67 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर चौथ्या डावात त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनं विजय मिळवला. याआधी 131 वर्षांपूर्वी 1888 मध्ये 67 पेक्षा कमी धावा केल्यानंतरही विजय मिळवला होता.

वाचा-स्टोक्सनं केली शिफारस, 1 धाव काढणाऱ्या जॅकला आयुष्यभर मिळत राहणार 'गिफ्ट'

चॉकलेट आणि फ्राईड चिकनमुळे इंग्लंडला मिळाला ऐतिहासिक विजय

इंग्लंडनं 359 धावांचा पाठलाग करताना, 286 धावांवर नऊ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्टोक्स 61 धावांवर खेळत होता. त्यानंतर बेननं चक्क 135 धावांची अनपेक्षित खेळी केली. त्याच्या सोबत जॅक लीचनं केवळ 1 धावा काढत 76 धावांची नाबाद खेळी केली. दरम्यान सामन्यानंतर स्टोक्सला अशी अविश्वसनीय खेळी खेळण्याआधी रात्री डोक्यात काय विचार होते असे विचारले असता स्टोक्सनं, “रात्री मी माझी पत्नी आणि मुलांसोबत होते. मला रात्री अचानक फ्राईड चिकन आणि चॉकलेट खाण्याची इच्छा झाली आणि सकाळी कॉफी प्यायलो”, असे सांगितले. तसेच, “आम्हाला माहित होते की हा सामना हातातून गेला तर, मालिका हातातून जाणार. जेव्हा दहव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात उतरला तेव्हा आम्हाला 70 धावा करायच्या होत्या. त्यावेळी मी फक्त सामना जिंकायचा आहे एवढाच विचार केला”, असे सांगत आनंद व्यक्त केला.

वाचा-अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार!

रस्ता खचल्यावर केलाय हा जुगाड; पाईपवरून जाणाऱ्या कारचा श्वास रोखायला लावणारा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ben stokes
First Published: Aug 26, 2019 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...