IND vs WI, 1st Test, Day 4 : अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार!

IND vs WI, 1st Test, Day 4 : अखेर 720 दिवसांनी अजिंक्य रहाणेनं केली 'कसोटी' पार!

अजिंक्य रहाणेनं 2017मध्ये श्रीलंकेविरोधात शतकी कामगिरी केली होती.

  • Share this:

अँटिगुआ, 25 ऑगस्ट : भारतानं वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशीही आपली पकड मजबूत केली आहे. चौथ्या दिवशी विराट कोहली 51 धावांवर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणेनं तब्बल 2 वर्षांनंतर शतकी कामगिरी केली. यासह भारतानं 300चा आकडा गाठला. सध्या भारताकडे 383 धावांची बलाढ्य आघाडी आहे. अजिंक्य रहाणेचे हे दहावे शतक असून, विहारी आणि कोहली यांच्यासोबत त्यानं शतकी भागिदारीही केली.

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या शतकी भागिदारीच्या जोरावर तिसऱ्या दिवस अखेर भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा केल्या होत्या. दरम्यान चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विराट कोहली 51 धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हनुमा विहारीनं अजिंक्य रहाणेसोबत भारताचा डाव पुढे नेला. रहाणे आणि विहारी यांनीही पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. यात हनुमा विहारीनं आपल्या अर्धशतक तर, रहाणेनं आपले 9वे शतक पूर्ण केले. या शतकासह रहाणेनं परदेशात त्याची बॅट चालते हे पुन्हा दाखवून दिले. रहाणेनं आपल्या करिअरमध्ये तब्बल 6 शतक आणि 15 अर्धशतक भारताबाहेर लगावले आहे.

कसोटी क्रिकेटचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनं 2017मध्ये श्रीलंकेविरोधात शतकी कामगिरी केली होती. त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी वेस्ट इंडिज विरोधात त्यानं ही कामगिरी केली आहे. दरम्यान पहिल्या डावातही अजिंक्यनं 81 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. 2011मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रहाणेनं 56 सामन्यात 3 हजार 488 धावा केल्या आहेत. यात 9 शतक आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, 188 ही त्याची सर्वोत्कृष्ठ खेळी राहिली आहे.

दरम्यान, पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. चहापानापर्यंत भारताने 98 धावांत तीन गडी गमावले होते. त्यानंतर कर्णधार कोहली आणि रहाणे यांनी शतकी भागिदारी केली. मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरले. तर केएल राहुलसुद्धा लवकर बाद झाला. भारताची अवस्था 3 बाद 81 अशी झाली होती. विंडीजच्या रोस्टन चेजनं 42 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर रहाणे आणि विराट कोहली यांनी भारताचा डाव सांभाळला.

वाचा-कोहली-रहाणेनं मोडला सचिन आणि गांगुलीचा सर्वात मोठा रेकॉर्ड!

'फक्त शतक करण्यासाठी खेळायला मी स्वार्थी नाही'

"मी स्वार्थी नाही आहे, माझ्या शतकापेक्षा जास्त संघ महत्त्वाचा आहे. संघाला कठिण प्रसंगातून कसा बाहेर काढू शकता, हा एवढाच विचार माझ्या डोक्यात होता", असे सांगितले. रहाणे फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा 25 धावांवर भारताच्या तीन विकेट गेल्या होत्या. मात्र, रहाणेनं संयमी खेळी करत संघाला 203 धावांपर्यंत घेऊन गेला. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शतकाबाबत विचारले असता, "जोपर्यंत मी संघासाठी योगदान देत आहे, तोपर्यंत मी आनंदी आहे. मी खेळतक असताना शतकाचा विचार करत होतो, मात्र अवघड परिस्थितीत संघासाठी खेळणे महत्त्वाचे होते", असे सांगितले. यावेळी रहाणेनं विहारीच्या खेळीचेही कौतुक केले. "विहारी हा असा खेळाडू आहे, जो संघासाठी खुप महत्त्वाचा आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजीमध्ये शानदार खेळी केली आहे. विहारी अडचणीच्या काळात योग्य पध्दतीनं फलंदाजी करतो", असे मत रहाणेनं व्यक्त केले.

वाचा-केएलनं घेतली मयंक अग्रवालची विकेट, या अनोख्या ‘पराक्रमा’चा व्हिडिओ एकदा पाहाच!

म्हणून शतकाची अत्यंत गरज होती रहाणेला

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळत होता. मात्र, रहाणेला चांगली कामगिरी करता आली नाही. काऊंटी क्रिकेटमध्ये त्याला केवळ एक शतक आणि एक अर्धशतक करता आले. याशिवाय सात डावांमध्ये त्याला दहा धावाही करता आल्या नाहीत. 7 सामन्यात त्यानं 307 धावा केल्या. त्यामुळं या शतकी खेळीची रहाणेला गरज होती.

वाचा-भारताची चॅम्पियन सिंधू जगात भारी! कमाई वाचून व्हाल थक्क

VIDEO: मुंबईत लोकलमध्ये चढताना महिला पडली खाली, RPF जवानाने देवादुतासारखा वाचवला जीव

Published by: Akshay Shitole
First published: August 25, 2019, 9:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading