स्टोक्सनं केली शिफारस, 1 धाव काढणाऱ्या जॅकला आयुष्यभर मिळत राहणार 'गिफ्ट'

स्टोक्सनं केली शिफारस, 1 धाव काढणाऱ्या जॅकला आयुष्यभर मिळत राहणार 'गिफ्ट'

बेन स्टोक्स आणि जॅक लीचने शेवटच्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी केली. यामध्ये लीचने एक धाव तर स्टोक्सनं 74 धावा काढून संघाला विजय मिळवून दिला.

  • Share this:

लीड्स, 26 ऑगस्ट : अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं धक्कादायक असा विजय नोंदवला. इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि जॅक लीच यांनी शेवटच्या गड्यासाठी 76 धावांची भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला. एकवेळ इंग्लंडला विजयासाठी 73 धावांची गरज होती. त्यावेळी इंग्लंडकडे एकच विकेट शिल्लक होती. त्यानंतरही इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेतला. शेवटच्या गड्यासाठी स्टोक्स आणि लीच यांनी 76 धावांची भागिदारी केली. यामध्ये एकट्या स्टोक्सनं 74 धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूनं जॅक लीचने आपली विकेट राखून ठेवत फक्त 1 धावा काढली. त्याच्या या कामगिरीची चर्चा सर्वत्र होत आहे.

स्टोक्सनं जॅकचं तोंडभरून कौतुक केलं आहे. सामन्यात विजय मिळवल्यानंतर स्टोक्सनं मालिकेचे प्रायोजक स्पेक्सेवर्सकडं लीचसाठी एक शिफारस केली होती. स्पेक्सेवर्सनं जॅक लीचला आयुष्यभर मोफत चष्मा देण्याची घोषणा केली आहे.

जॅक लीच खेळत असताना वारंवार चष्मा स्वच्छ करताना दिसत होता. विजयानंतर स्टोक्सने ट्विट करून प्रायोजकांनी लीचला आयुष्यभर मोफत चष्मा द्यायला हवा असं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना स्पेक्सेवर्सनं लीचला आयुष्यभर चष्मा देण्याची ऑफर दिली आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लीड्सवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने एक गडी राखून विजय मिळवला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 179 धावांत रोखल्यानंतर इंग्लंडचा डाव 67 धावांत आटोपला होता. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं 246 धावा करून यजमानांना मोठं आव्हान दिलं होतं. हे आव्हान 9 गड्यांच्या मोबदल्यात पार करून इंग्लंडनं मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

VIDEO: विरोधकांनी वाईट शक्तींचा वापर केल्यानं भाजपच्या नेत्यांचा मृत्यू, साध्वी प्रज्ञा पुन्हा बरळल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 02:30 PM IST

ताज्या बातम्या