Home /News /sport /

एका मिनिटाला एवढे पैसे! ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचला मिळणारी रक्कम ऐकून व्हाल अवाक

एका मिनिटाला एवढे पैसे! ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचला मिळणारी रक्कम ऐकून व्हाल अवाक

दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने 8 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. आपल्या या यशाचे श्रेय जोकोविचने शाकाहार, योग आणि ध्यानधारणा याला दिलं आहे.

    मेलबर्न, 03 जानेवारी : दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचने 8 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. आपल्या या यशाचे श्रेय जोकोविचने शाकाहार, योग आणि ध्यानधारणा याला दिलं आहे. सतत युद्धाच्या छायेत असलेल्या सार्बियातील बेलग्रादमध्ये जन्म झालेल्या जोकोविचने टेनिसचा सराव रिकाम्या स्विमिंग पूलमध्ये केला. टेनिस जगतात नाव कमवण्याआधी त्याला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. यात अनेक चढ उतार अनुभवल्यानंतर तो परिपक्व झाला. गेल्या वर्षी विम्बल्डन फायनल जवळपास 5 तास झाली. त्याआधी 2012 मध्ये 6 तासांपर्यंत ऑस्ट्रेलियन ओपनचा सामना रंगला होता. त्यात जोकोविचने बाजी मारली होती. आथापर्यंत 17 ग्रँडस्लॅम जिंकलेल्या 32 वर्षीय जोकोविचची नजर आता रॉजर फेडरर आणि राफेल नादाल यांच्या विक्रमावर आहे.  जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर पार्टी करण्याऐवजी अंजिराच्या झाडावर चढून आनंद साजरा केला. याबद्दल त्याने सांगितलं की, ब्राझीली अंजिराचे झाड माझं मित्र आहे. त्या झाडावर चढणं हा माझा छंद आहे आणि माझं सर्वात आवडतं काम आहे. एका मिनिटासाठी मिळाले 2 लाख 48 हजार रुपये जोकोविचला विजेता ठरल्याबद्दल 41 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर बक्षिस म्हणून मिळाले. भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर जोकोविचला 20 कोटी 95 लाख 92 हजार रुपये इतके होतात. त्याने या विजेतेपदासाठी टेनिस कोर्टवर 843 मिनिटं खेळ केला. या हिशोबाने त्याला प्रत्येक मिनिटासाठी दोन लाख 48 हजार रुपये मिळाले. योग आणि ध्यानधारणा जोकोविचने त्याच्या सगळ्या यशाचं श्रेय रोजच्या आहार-विहाराला दिलं आहे. याशिवाय भारताने जगाला दिलेली देणगी म्हणजे योग. या योगाचाही अभ्यास जोकोविच करतो. योग आणि ध्यानधारणेला त्यानं महत्त्वाचं मानलं आहे. जोकोविचचा दिवस सकाळी सुर्योदयाआधी सुरू होतो. त्यानंतर कुटुंबासोबत वेळ घालवतो.  घरातल्या लोकांना भेटणं. त्यांच्यासोबत गाणी म्हणणं , योगाभ्यास इत्यादी गोष्टी सकाळच्या वेळेत करतो. त्याच्या आहारात पूर्णपणे शाकाहारी पदार्थांचा समावेश असतो. इतरांना शाकाहाराची प्रेरणा मिळेल खेळामध्ये सराव करताना प्रचंड घाम गाळावा लागतो. त्यानंतर गेलेली उर्जा मिळवण्यासाठी तितकाच सकस आहार गरजेचा असतो. जोकोविच म्हणतो की, मला आशा आहे की मी इतर खेळाडूंनाही शाकाहारासाठी प्रेरणा देऊ शकेन. दुखापतीनंतर वळला अध्यात्माकडे पहिल्यांदा 2008 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या जोकोविचने 2011 पासून 2016 पर्यंत 24 पैकी 11 ग्रँड स्लॅम जिंकली तर 7 अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्यानतंर दुखापतीमुळे त्याला काही काळ मैदानापासून दूर रहावं लागलं. 2017 च्या विम्बल्डन स्पर्धेत फॉर्ममध्ये परतला. त्याचवेळी तो अध्यात्माकडे वळला होता. यामुळेच आपण सहनशील झाल्याचं त्यानं सांगितलं होतं. क्रिकेटपटूने लाज सोडली! फिटनेस टेस्ट नापास झाल्याने काढले सगळे कपडे
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Novak Djokovic, Tennis

    पुढील बातम्या