VIDEO: सानिया मिर्झाबरोबर एक दिवस! जिम, टेनिस, फोटोशूट, मुलाखती आणि मुलाची गोंडस लुडबुडही

टेनिस स्टार सानिया मिर्झा अत्यंत लोकप्रिय आहे. तिचा हा नवा व्हिडिओ तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचीही संधी देतो पाहा.

टेनिस स्टार सानिया मिर्झा अत्यंत लोकप्रिय आहे. तिचा हा नवा व्हिडिओ तिच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचीही संधी देतो पाहा.

 • Share this:
  मुंबई, 10 फेब्रुवारी : भारताची सेलिब्रिटी टेनिस स्टार (Tennis star player) म्हणून ओळखली जाणारी खेळाडू म्हणजे सानिया मिर्झा (Sania Mirza) सानिया मैदानावर उत्तम कामगिरी करतेच. मात्र ती सोशल मीडियावरही (social media) सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओज ती आवर्जून पोस्ट करत असते. आज सानियानं एक अनोखा व्हिडिओ (Instagram) पोस्ट केला आहे. याला तिनं अ डे इन माय लाईफ (a day in my life) असं नाव दिलं आहे. यात तिनं आपल्या दिवसभरातले काही निवडक क्षण चाहत्यांसमोर ठेवले आहेत. हा निवडक क्षणांचा कोलाज अतिशय आकर्षक झाला आहे. अवघ्या काही मिनिटांच्या या व्हिडिओत ती दिवसभरात कितीकाही विविध प्रकारच्या गोष्टी करते याची बोलकी झलक दिसते. सुरवातीला ती जिममध्ये (gym) व्यायाम (exercise) करताना दिसते. त्यानंतर तिचे सहकारी आरशासमोर तिचं ग्रूमिंग करत आहेत. तिचा मुलगाही सगळ्यांच्या मध्येमध्ये खेळतो आहे. पुढच्या दृश्यात ती एक मुलाखत (interview) देते आहे. काही सेकंदानंतर ती वेगळाच आकर्षक पोषाख घालत फोटोशूट (photo shoot) करताना दिसते. मध्येच टेनिसचा (Tennis) रोजचा सराव करतानाही आपण तिला पाहू शकतो. हेही वाचाVIDEO: हे काही तरी भन्नाट आहे; पाहा तान्हाजीमधील चुलत्याचा नवा अंदाज सोबतच लॅपटॉपसमोर (laptop) बसून ती काहीतरी पाहताना टीव्हीवर तिची मुलाखतही ती बघणं जमवत आहे. एका कितीकाही एकरण्याची तिची ऊर्जा कुठून येते असा प्रश्न नक्कीच  नाही. या व्हिडिओला चार तासात पस्तीस हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. दोनशे लोकांनी यावर सानियाचं भरभरून कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Sania Mirza (@mirzasaniar)

  सानिया नुकतीच कोरोना संसर्गामधून (corona) बाहेर आली आहे. याबाबत तिनंच सोशल मीडियावर माहिती दिली होती. कुठलंही गंभीर लक्षण न दिसता यातून आपण सुरक्षित बाहेर आलो याबद्दल आपण भाग्यवान असल्याची भावना तिनं व्यक्त केली होती.
  Published by:News18 Desk
  First published: