काय आहे प्रकरण? जोकोविचनं मेडिकल कारण देत व्हिसा नियमांमध्ये सूट देण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली होती. आपली मागणी मान्य झाल्याचा दावा करत जोकोविच मेलबर्नमध्ये दाखल झाला. त्यावेळी त्याला विमानतळावरच अडवण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी इमिग्रेशन सेंटरमध्ये करण्यात आली. सरकारच्या निर्णयाला जोकोविचने ऑस्ट्रेलियातील कोर्टात आव्हान दिले होते. विराटनं राजीनामा देताच टीम इंडियात बदलाचे वारे, 2 जागांसाठी 3 जणांमध्ये स्पर्धा जोकोविचचे पहिले अपिल कोर्टाने मान्य केले. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांचे अधिकार वापरत जोकोविचचा व्हिसा रद्द केला नागरिकांच्या हितासाठी, स्थलांतर कायद्यातील 133 C (3) कलमाच्या अंतर्गत जोकोविचचा व्हिसा रद्द करण्याचा अधिकार सरकार वापरत आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन मंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर फेडरल कोर्टानेही सरकारचा निर्णय मान्य केल्यानं जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपन न खेळतातच परत जावं लागणार आहे.BREAKING: Novak Djokovic’s hopes of playing at the Australian Open have been dashed after a court dismissed the top-ranked tennis star’s appeal against a deportation order. https://t.co/pyqcpxtG0w
— The Associated Press (@AP) January 16, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Australia, Corona vaccine, Tennis player